कळवण पंचायत समितीला तृतीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:16+5:302021-03-14T04:15:16+5:30
केंद्र व राज्य शासनाकडून गट स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजना, त्याच बरोबर उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज याचे मूल्यमापन विभागस्तरावर करण्यात येऊन ...
केंद्र व राज्य शासनाकडून गट स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजना, त्याच बरोबर उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज याचे मूल्यमापन विभागस्तरावर करण्यात येऊन ३ पंचायत समित्यांची निवड विभागनिहाय करण्यात येते. कळवण पंचायत समितीला लागोपाठ तिसऱ्या वर्षी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
नाशिक व कळवण या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये सोलर पॅनलिंगचा वापर करून ऊर्जेची बचत, स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी, वृक्षलागवडीची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती, संपूर्ण लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती यासह इतर सर्व योजना व कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाशिक पंचायत समिला द्वितीय क्रमांकाचे ८ लाख रुपये आणि कळवण पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचे ६ लाख रुपये तसेच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.