संसरी गावाला तिसऱ्यांदा खासदार पद मिळण्याने जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:52 AM2019-05-24T01:52:45+5:302019-05-24T01:53:05+5:30
संसरी गावाला तिसऱ्यांदा खासदार पद मिळण्याचे भाग्य लाभले असून, खासदार हेमंत गोडसे यांनी नाशकात दुसºयांदा विजयी होऊन इतिहास रचला आहे.
नाशिकरोड : संसरी गावाला तिसऱ्यांदा खासदार पद मिळण्याचे भाग्य लाभले असून, खासदार हेमंत गोडसे यांनी नाशकात दुस-यांदा विजयी होऊन इतिहास रचला आहे. गोडसेंचा विजय निश्चित होताच संसरी गावात व त्यांच्या घरी महिला व ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.
लोकसभा निवडणुकीत नाशिकला सलग दुसºयांदा खासदार निवडून येत नाही, असा गेल्या काही वर्षांतील इतिहास आहे. तरीदेखील शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली. गुरु वारी मतमोजणी प्रक्रि या सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच गोडसेंनी विजयाच्या मार्गावर मार्गक्र मण करण्यास सुरु वात केली होती. प्रत्येक फेरीला गोडसे हे मताधिक्य घेत आघाडीवर राहिले. मतमोजणी सुरू होण्याच्या वेळी खासदार गोडसे यांच्या पत्नी अनिता या गावातील मारु ती मंदिरात सकाळपासून पोथी वाचत देवाला विजयाचे साकडे घातले. दुपारपासून मतमोजणीदरम्यान गोडसे यांचे मताधिक्य जसे वाढू लागले तसे संसरीतील गोडसेंच्या घरी ग्रामस्थ व परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची गर्दी वाढू लागली होती. सायंकाळी गोडसेंनी दोन लाखांच्यावर आघाडी घेतल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याने त्यांच्या घरी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. सलग दुसºयांदा खासदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास हेमंत गोडसे यांनी केल्याने प्रत्येकाच्या चेहºयावरून आनंद ओसंडून वाहत होता. लॅमरोड व संसारी गावात आदी सर्व ठिकाणी मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. मध्यरात्री उशिरापर्यंत लॅमरोड संसरी देवळाली गाव व आजूबाजूच्या भागांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले. संसरी गावाबरोबरच आजूबाजुच्या पंचक्रोशीत देखील गोडसे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या देवळाली मतदारसंघातील गावागावात गोडसे यांच्या विजयाचा गुलाला उधाळण्यात आला.