‘त्या’ स्फोटात भाजलेला तिसऱ्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:21+5:302021-04-07T04:15:21+5:30
इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन ...
इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामध्ये दोन महिला व दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या शोएब वलीउल्ला अन्सारी (२८) याचाही सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात दुपारी दफनविधी करण्यात आला. आतापर्यंत झालेल्या पाच मृत्यूच्या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-
----इन्फो----
....यांचा झाला मृत्यू
या दुर्घटनेत नसरीन नुसरद सय्यद (२५), नुसरद रहीम सय्यद (२५), लियाकत रहीम सय्यद (३२)
सईदा शरफोद्दीन सय्यद (४९), शोएब वलिऊल्ला अन्सारी (२८), यांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
--इन्फो---
पीडितांच्या पुनर्वसनाची मागणी
जुन्या नाशकातील संजरीनगर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सय्यद, अन्सारी कुटुंबीयांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सय्यद कुटुंबीयाने या दुर्घटनेत आपल्या दोघा तरुण मुलांसमवेत मुलगी व सुनेला कायमचे गमावले आहे. या दुर्घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अन्सारी कुटुंबातील तरुणाचाही या दुर्घटनेत मंगळवारी बळी गेला. हे दोन्ही कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या पुनर्वसन करण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करत पुढाकार घेण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून होत आहे. दोन्हीही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती.
--------
इन्फो
पीडितांच्या मदतीसाठी युवक सरसावले
संजरीनगर व अकबर अली मार्केट परिसरातील युवकांनी एकत्र येत या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. गंभीरपणे जखमी असलेल्या रमजान वल्लीउल्ला अन्सारी (२२) व मुस्कान वलीउल्लाह अन्सारी (२५) या दोघांना मुंबईनाका परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलण्यात आले आहे. त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी या युवकांनी उचलली आहे. याबरोबर सय्यद कुटुंबीयांचा संसार पुन्हा उभा करण्याचा निर्धार या युवकांनी केला आहे. समाजातील दनशुरांना त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांनीदेखील दोन्ही कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच हेलबावडी-दख्नीपुरा मशिदीत मदतनिधी उभारण्यात येत असल्याची माहिती हाजी जाकीर अन्सारी यांनी दिली आहे.
-------
मयत शोएब याचा फोटो nsk वर सेंड केला आहे.