अंगणात पाणी ठेवून भागविली जातेय पक्षांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:45 PM2019-06-26T13:45:05+5:302019-06-26T13:45:40+5:30
खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यासाठीची धडपड वाढू लागली आहे.
खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यासाठीची धडपड वाढू लागली आहे. वाढते शहरीकरण व झाडाझुडपांची कमी झालेली संख्या यामुळे पक्षांंच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. शहरातील केबल वायर, मोबाईलमुळे पक्षांंच्या प्रजनन क्षमतेवर व मानिसकतेवर परिणाम झाला असून, चिमण्या कमी होण्याची हीचकारणे आहेत. आपण भुतदयेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्राणी व पक्षांसाठी पाणवठे तयार करावे, असे आवाहन शिवराय ग्रुपद्वारे सोशल मिडियावर केले असता त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जेथे माणसाला घोटभर पाण्यासाठी भटकावे लागते तेथे मुक्या प्राण्यांची अवस्था काय असणार, या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी पक्षांंच्या चारा पाण्यासाठी आपल्या घरात, अंगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपापल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे अनेक सामाजिक संस्था, विविध शाळा व ग्रुप अशा सर्वानी भूतदया दाखवत दाणा-पाण्याची सोय केली. मनुष्याची तृष्णा भागविण्यासाठी ज्या प्रमाणे पाणपोईची व्यवस्था ठिकठिकाणी केली जाते. त्याचप्रमाणे नागरिकांनी पक्षी व प्राण्यांसाठी सुखसुविधा करण्यासाठी मेहनत घेतल्याचे सुखद चित्र बघावयास मिळत आहे. ( 26चिमणी) ( 26चिमणी०१)