नाशकात रविवारी तेराशे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:54+5:302021-03-15T04:14:54+5:30

नाशिकमध्ये रविवारी कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण दगावल्याने एकूण मृत्यूचा आकडा वाढून २ हजार १७० इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात ...

Thirteen hundred corona in Nashik on Sunday | नाशकात रविवारी तेराशे कोरोनाबाधित

नाशकात रविवारी तेराशे कोरोनाबाधित

Next

नाशिकमध्ये रविवारी कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण दगावल्याने एकूण मृत्यूचा आकडा वाढून २ हजार १७० इतका झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात एकूण १ हजार ६३१ नवे संशयित रुग्ण उपचारासाठी वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये दाखल झाले आहेत. सध्या एकूण ८ हजार ४८ कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. २ हजार ४९४ कोरोना नमुना चाचणी अहवाल प्रगतिपथावर आहेत. यापैकी शहरातील १ हजार ५९१ तर ग्रामीण भागातील ६१९ अहवालांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षभरापासून आतापर्यंत १ लाख ३३ हजार ५९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १ लाख २३ हजार ३७२ रुग्ण कोरोनावर मात करण्यास यशस्वी झाले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे रुग्ण बरे होण्याची एकूण टक्केवारी ९२.३५ इतकी आहे.

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने वीकेण्डला शहर व ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अंमलबजावणी केल्याचे चित्र रविवारीही पाहावयास मिळाले, तसेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता, अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत शहरासह ग्रमाीण भागातील कोरोना रुग्णांचा आकडा घसरेल, असा आशावाद जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Thirteen hundred corona in Nashik on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.