दोन दिवसात तेराशे रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:27 AM2020-08-17T01:27:09+5:302020-08-17T01:27:28+5:30

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २४ हजार ४५७ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसात उपचारार्थ दाखल १३ रुग्ण दगावले. यामध्ये ९ मनपा हद्दीतील तर ४ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण १ हजार ३५१ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर सरासरी ७७ टक्के इतका असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

Thirteen hundred patients overcome corona in two days | दोन दिवसात तेराशे रुग्णांची कोरोनावर मात

दोन दिवसात तेराशे रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे १३ बळी : मृतांचा आकडा ६८९

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २४ हजार ४५७ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसात उपचारार्थ दाखल १३
रुग्ण दगावले. यामध्ये ९ मनपा हद्दीतील तर ४ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण १ हजार ३५१ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर सरासरी ७७ टक्के इतका असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. या दोन दिवसात जिल्ह्यात नव्याने १ हजार ८६ रु ग्ण आढळून आले आहे. तसेच ८४१ नवे संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढणार असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी बाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर मास्क लावत परस्परांमध्ये अंतर राखत वेळोवेळी आपले हात सॅनिटाइज करत अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात १८ हजार ९३१ रुग्ण कोरोनामुक्तनाशिक ग्रामीणमध्ये रविवारी
१६९ तर मालेगावात ३६ संशयित मिळून आले. नाशिक मनपा हद्दीत १०७ संशयित आढळून आले. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी नागरिकांना प्रशासनाला अधिकाधिक सहकार्य करावे लागणार आहे.
च्जिल्ह्यात एकूण १८ हजार ९३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ६८९ बाधितांचा मृत्यू झाला तर ४ हजार ८३७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
च्कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसून दररोज सुमारे ५०० नवीन बाधित आढळून येत आहेत. जिल्ह्यात १५ व १६ आॅगस्ट रोजी १ हजार ८६ बाधित आढळून आले आहेत. त्यात शहरात सर्वाधिक ६११ ग्रामीणला ३५७ आणि मालेगाव येथे ११८ बाधित आढळून आले. ग्रामीणमध्ये चांदवड, निफाड आणि रावळगाव येथील चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १ हजार ३८९ संशयितांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

Web Title: Thirteen hundred patients overcome corona in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.