तेरा रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:10 AM2020-01-12T00:10:02+5:302020-01-12T01:33:43+5:30
बागलाण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नोंद असलेल्या ३४६४ किलोमीटरच्या तेरा रस्त्यांच्या सुधारित प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. या रस्त्यांमध्ये नव्याने २३२ किलोमीटरची भर पडून ३६९६ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग म्हणून नोंद असलेल्या ३४६४ किलोमीटरच्या तेरा रस्त्यांच्या सुधारित प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.
या रस्त्यांमध्ये नव्याने २३२ किलोमीटरची भर पडून ३६९६ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. नाशिक जिल्हा परिषदेने पाठवलेल्या प्रस्तावानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव प्रशांत पाटील यांनी तसे परिपत्रक काढले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार बोरसे यांनी ही मागणी केली होती.
बागलाण तालुक्यासह इतर जिल्ह्यांना जोडणारे हे रस्ते जिल्हा परिषदकडे होते. पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे या कामांची अतिशय दुरवस्था होऊन दळणवळणची समस्या निर्माण झाली होती. आता या रस्त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत केल्यामुळे या रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. एकूण तेरा रस्ते इतर जिल्हा मार्ग मधून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून नव्याने नावरूपास येणार आहेत. यामध्ये दोनशे बत्तीस किलोमीटरच्या अधिकच्या रस्त्यांची भर पडणार आहे. आगामी काळात या रस्त्यांच्या विकासासाठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची भरीव तरतूद करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.
प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झालेले रस्ते
उत्राणे-तळवाडे भामेर-बिलपुरी, बोढरी-चिराई ,सटाणा-चौगाव, कºहे-रातीर- जुने रातीर, वायगाव, चौंधाणेपासून-नवे निरपूर-खमताणे-सटाणा, खामखेडा-सावकी-ठेंगोडा-आराई-शेमळी, ढोलबारे-पारनेर-निताणे, लाडूद-सोमपूर-तांदूळवाडी, नांदिन- जुने रातीर, कुपखेडा-खिरमाणी-फोपीर-आसखेडा-वाघळे—श्रीपूरवडे-टिंगरी, निताणे-जायखेडा-एकलहरे-वाडी पिसोळ, दºहाणे-पिंपळदर-नवेगाव-तिळवण, सरवर-दहिंदुले, जोरण, इजमाणे-मळगाव-भामरे, पोहाणे, अजमीर सौंदाणे, चौगाव-भाक्षी-भंडारपाडा, आव्हाटी, देवळाणे- नवे रातीर, सारदे-अंबासन, सोमपूर-भडाणे-पिंपळकोठे, दसवेल-तुंगन दिगऱ