आरटीईच्या तेराशे जागा रिक्त : शिक्षणाचा हक्क मिळणार कसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 04:34 PM2019-10-04T16:34:15+5:302019-10-04T16:39:23+5:30

शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेºया घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे.

Thirteen RTE Vacancies: How to Get Right to Education | आरटीईच्या तेराशे जागा रिक्त : शिक्षणाचा हक्क मिळणार कसा 

आरटीईच्या तेराशे जागा रिक्त : शिक्षणाचा हक्क मिळणार कसा 

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण हक्कापासून तेराशे विद्यार्थी वंचीत जागा रिक्त असूनही प्रवेश नाहीक्लिष्ट प्रवेश प्रक्रियेचा फटका

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हा भरातील सुमारे तेराशे विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाºयांमुळे जिल्हाभरातील तेराशे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही. तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त असूनहीप्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत सूचना शिक्षण विभागाने अद्याप जारी केली नसली तरी याप्रक्रियेतील चारफेऱ्या पूर्ण झाल्यानंतर प्रवेशप्रक्रियेतील सर्व कार्यवाही थांबविण्यात आली आहे. दरवर्षी जुलैच्या अखेपर्यंत शेवटची लॉटरी निघून प्रवेशप्रक्रिया जवळपास पूर्ण होते. परंतु, यावर्षी सप्टेंबर संपेपर्यंत प्रवेशाचा घोळ सुरूच असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये उपलब्ध ५ हजार ७३५ जागांपैकी १ हजार २९९ जागा रिक्त आहे. विशेष म्हणजे चौथ्या फेरीपूर्वी ही संख्या दीड हजारांहून अधिक होती. याविषयी पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने शिक्षण विभागाने चौथी फेरी घेतली. या फेरीत सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असले तरी अद्यापही १,२९९ जागा रिक्त असून, या संदर्भात कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही याविषयी पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

Web Title: Thirteen RTE Vacancies: How to Get Right to Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.