थर्टी फर्स्टला जिल्ह्यात १७८ तळीरामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:46 AM2018-01-02T00:46:13+5:302018-01-02T00:49:31+5:30
नाशिक : थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबरला मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील १०९, तर ग्रामीण हद्दीतील ६९ अशा एकूण १७८ तळीरामांवर पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई केली़ या व्यतिरिक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ४११ वाहनधारकांकडून ९८ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले, तर ग्रामीण भागात मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या १८५ केसेस करून ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील तळीरामांवरील कारवाईचा विचार करता गत दोन वर्षांत करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे़

नववर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, तर ग्रामीणमध्ये अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ शहर वाहतूक पोलिसांनी ४१ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत सुमारे शंभराहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली, तर ग्रामीणमधील ४० पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ त्यासाठी जिल्ह्णातील महामार्ग, वर्दळीचे ठिकाणे,चेक पोस्ट आदी ठिकाणी बॅरिकेड व नाकाबंदी करण्यात आली होती़ ड्रंक अॅन्ड ड्राइव्हला लगाम घालण्यासाठी ब्रिथ अॅनालायझर मशीनने तपासणी करण्याबरोबरच हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट या ठिकाणांवर फिक्स पॉइंट लावून वाहतूक कोंडी आणि सुरक्षात्मक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती़
रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहरात थर्टी फर्स्ट जोरात साजरा केला जाणार, असा अंदाज होता़ मात्र दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट होता, तर सायंकाळनंतर तरुणाई तसेच नागरिक सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडले़ शहरातील बड्या हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते़, तर दुसरीकडे मद्यप्राशन करीत वाहन चालवून स्वत: तसेच इतरांच्या अपघातास कारणीभूत ठरू नका, असा संदेश पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला होता़ गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड, आनंदवली रस्ता, मखमलाबाद-आनंदवली गोदाकाठ रस्ता, मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर अशा शहरातील जवळपास सर्वच परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रत्येक चौकांमध्ये तसेच सिग्नलवर पोलीस कर्मचाºयांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.
शहर वाहतूक पोलिसांच्या ४२ ठिकाणच्या नाकाबंदीत दुचाकीधारकांची ‘ब्रेथ अॅनालाइजर’ने तपासणी केली असता त्यामध्ये १०९ जण मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले़ त्यांच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हनुसार कारवाई करण्यात आली़