थर्टी फर्स्टला तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:12 AM2018-12-30T00:12:37+5:302018-12-30T00:27:40+5:30

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़

Thirty-fours have seen the police in Talairam | थर्टी फर्स्टला तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

थर्टी फर्स्टला तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

Next

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़ या थर्टी फर्स्टला शहरात पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने तळीरामांची तपासणी केली जाणार आहे़
राज्य सरकारने ३१ डिसेंबर रोजी बिअर व वाइन शॉपी तसेच देशी दारू दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत तर दुसºया दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम/ बिअर बार उघडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील चार पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून, पोलीस ठाणेनिहाय विशेष गस्त पथक तयार करण्यात आले आहे़
पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाणे हद्दीत किमान तीन नाकाबंदी पॉइंट असून, त्यानुसार अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत़ पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाºयांना दोन फेजमध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे़ शहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणेरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवर ४२ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे़
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत केल्या जाणाºया नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पंधरा अधिकारी व २७२ कर्मचारी तैनात केले जाणार असून, १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़ यावेळी हुज्जत घालणाºया नागरिकांसाठी १३० बॉर्डी वॉर्न कॅमेराद्वारे छायाचित्रणही केले जाणार आहे़  तसेच पोलिसांच्या नजरेतून एकही मद्यपी वाहनचालक सुटणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे़
ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई
थर्टी फर्स्टला वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़ या मशीनद्वारे शरीरात किती अल्कोहोल आहे हे समजणार असून, मद्यपी वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे़
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारे ३१ डिसेंबर साजरा करू नये़ शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहेत़ त्यामुळे नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याबाबत दक्षता घ्यावी़
- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपआयुक्त, नाशिक

Web Title: Thirty-fours have seen the police in Talairam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.