स्वखर्चाने काढली काटेरी झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 07:14 PM2019-07-17T19:14:06+5:302019-07-17T19:14:56+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील गोई नदीलगत असलेला मानोरी ते मानोरी फाटा या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत कामामुळे दिवसेंदिवस खडतर होत चालली असल्याचे लक्षात आल्याने एका शिवसैनिकाने संबंधित विभागाची वाट न पहाता स्वखर्चाने या मार्गावरील ही धोकादायक काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने दूर केली.

Thorny bushes | स्वखर्चाने काढली काटेरी झुडपे

मानोरी ते मानोरी फाटा या एक किलोमीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपा व बाभळी जेसीबीच्या सहाय्याने काढताना सुनील शेळके.

googlenewsNext
ठळक मुद्देमानोरीत : एक किलोमीटर रस्ता केला अतिक्र मण मुक्त

शुभ वर्तमान
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील गोई नदीलगत असलेला मानोरी ते मानोरी फाटा या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत कामामुळे दिवसेंदिवस खडतर होत चालली असल्याचे लक्षात आल्याने एका शिवसैनिकाने संबंधित विभागाची वाट न पहाता स्वखर्चाने या मार्गावरील ही धोकादायक काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने दूर केली.
मानोरी ते मानोरी फाटा रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांचे मोठ्या प्रमाणात अतिक्र मण झाले असताना या रस्त्याने रहदारी करणे धोकादायक ठरत असताना मानोरी बुद्रुक येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुनील शेळके यांनी बुधवारी (दि.१७) कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा केला आहे.
या परिसरात रस्त्यावर नागमोडी वळणे मोठ्या प्रमाणात असून काटेरी झुडपांचे अतिक्र मण वाढत चालल्याने धोकादायक वळणावर या काटेरी झुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने नेहमी अपघात घडत होते. तसेच महिन्याभरापूर्वी बांधकाम विभागाने देशमाने, मानोरी बुद्रुक, मुखेड या पाच ते सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कडेली असलेली काटेरी झुडपे आणि बाभळी काढल्याने रस्ता रहदारी सुखकर झाली आहे. आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून मानोरी येथे महिन्यापूर्वी ९०० मीटर अंतराचा रस्ता नव्याने डांबरीकरण झाल्याने वाहनांची वर्दळ पुन्हा वाढू लागली आहे.

Web Title: Thorny bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.