‘त्या’ चायनीज विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:41 AM2017-09-26T00:41:35+5:302017-09-26T00:41:40+5:30

महापालिकेने नेहरू उद्यानात अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महापालिकेने हटविल्यानंतर आता सदर विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, शिवाजी उद्यानात सदर विक्रेत्यांना जागा दिल्यास महापालिकेकडून अतिक्रमणधारकांना एकप्रकारे प्रोत्साहनच दिले जाणार असल्याने त्यास विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे.

 'Those' Chinese merchants rehabilitate Shivaji Park? | ‘त्या’ चायनीज विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन?

‘त्या’ चायनीज विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन?

Next

नाशिक : महापालिकेने नेहरू उद्यानात अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महापालिकेने हटविल्यानंतर आता सदर विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, शिवाजी उद्यानात सदर विक्रेत्यांना जागा दिल्यास महापालिकेकडून अतिक्रमणधारकांना एकप्रकारे प्रोत्साहनच दिले जाणार असल्याने त्यास विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे.  महापालिकेने नेहरू उद्यानात गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाºया व्यावसायिकांना हटविण्याची कारवाई काही दिवसांपूर्वीच केली. याशिवाय, या विक्रेत्यांना प्रोत्साहन देणाºया श्रमिक सेनेचा फलकही तेथून उखडून टाकला. दरम्यान, महापालिकेच्या कारवाईनंतर संबंधित विक्रेत्यांनी महापालिका प्रशासन उपआयुक्तांची भेट घेत जवळच्याच जागेत पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने जवळपास कोठेही जागा देण्यास नकार दिला. हॉकर्स झोन अंतर्गत हॉटेल संदीपजवळील जागेचा तसेच गोदाघाटावरील घासबाजाराच्या जागेचा पर्याय महापालिकेने सदर विक्रेत्यांपुढे ठेवला होता. परंतु, विक्रेत्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. याउलट, शिवाजी उद्यानात कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, याकरिता दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानात जागा देण्यास प्रशासनाने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे समजते. शिवाजी उद्यानात संबंधित विक्रेत्यांना जागा दिल्यास त्याचे वेगळे परिणाम दिसून येण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले असून, सहा महिन्यात नेहरू उद्यानाचे नवे रूप पहायला मिळण्याची शक्यता आहे.
शाळेजवळील विक्रेत्यांनीही गुंडाळला गाशा
महापालिकेने नेहरू उद्यानातील अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित विक्रेत्यांनी सारडा कन्या शाळेलगतच्या भिंतीजवळ व्यवसाय करू देण्याची मागणी केली होती परंतु, सदर परिसर हा नो हॉकर्स झोन असल्याने मनपाने ही मागणी फेटाळून लावलेली आहे. सारडा कन्या शाळा व्यवस्थापनानेही महापालिका आयुक्तांची भेट घेऊन भिंतीलगत असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती, परंतु नेहरू उद्यानातील अतिक्रमणाचा धसका घेत शाळेजवळील विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला आहे.

Web Title:  'Those' Chinese merchants rehabilitate Shivaji Park?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.