बदनामीसाठीच ‘त्या’ महिलांचे हिंदुत्ववाद्यांशी साटेलोटे

By admin | Published: March 13, 2016 11:14 PM2016-03-13T23:14:06+5:302016-03-13T23:34:19+5:30

तृप्ती देसाई : बैठक न घेतल्यास १९ मार्चला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा पुन्हा इशारा

'Those' women for defamation will be scared of Hindu activists | बदनामीसाठीच ‘त्या’ महिलांचे हिंदुत्ववाद्यांशी साटेलोटे

बदनामीसाठीच ‘त्या’ महिलांचे हिंदुत्ववाद्यांशी साटेलोटे

Next

नाशिक : हिंदुत्ववाद्यांशी आर्थिक व्यवहार करून दुर्गा शुक्रे यांनी आपल्या बदनामीचे षड्यंत्र रचल्याचा सनसनाटी आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानशी वाटाघाटी करणाऱ्या या महिलांचा भूमाता ब्रिगेडशी कोणताही संबंध नसून, त्यांची १० फेब्रुवारी रोजीच मूळ संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ७ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्याला त्र्यंबकेश्वरवासीयांनी तीव्र विरोध केला होता. प्रशासनाने देसाई यांना कार्यकर्त्यांसह नांदूरशिंगोटे येथेच रोखल्याने संघर्ष टळला होता; मात्र देसाई यांनी त्र्यंबक देवस्थानसमवेत बैठक बोलावण्यासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली होती. शनिवारी भूमाता महिला ब्रिगेडच्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप आदिंनी त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये बैठक घेऊन तृप्ती देसाई यांची भूमाता ब्रिगेडमधून हकालपट्टी केल्याचे वक्तव्य केले होते. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय धर्मसंसद घेईल, असा निर्णयही घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या आपण संस्थापक अध्यक्ष असून, २७ सप्टेंबर २०१० रोजी या संघटनेची स्थापना केली. शुक्रे, केवाडकर, जगताप या आपल्या संघटनेच्या सदस्य होत्या; मात्र शनि शिंगणापूरच्या आंदोलनानंतर मला प्रसिद्धीचा हव्यास असल्याचा आरोप करीत त्या संघटनेतून बाहेर पडल्या. त्यांनी राजीनामेही पाठवले नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी मीच त्यांची हकालपट्टी केली. मी संस्थापक अध्यक्ष असताना त्या माझी हकालपट्टी कशी करू शकतात? त्यानंतर सात-आठ दिवसांनी त्यांनी आमच्या संघटनेशी नामसाधर्म्य असलेली ‘भूमाता महिला ब्रिगेड’ नामक संघटनेची स्थापना केली. या संघटनेनेच आता हिंदुत्ववाद्यांशी हात मिळवून मला बदनाम करण्याचे कारस्थान रचले
आहे. त्यांना आपण आजपर्यंत एकही फोन केलेला नाही.
त्यामुळे मी त्यांना धमकी देत असल्याचे खोटे सांगितले जात आहे. मी राज्यात ठिकठिकाणी प्रबोधन परिषदा घेत असून, त्यांना धमकी देण्याचा संबंधच काय, असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Those' women for defamation will be scared of Hindu activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.