आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:45 AM2018-09-15T00:45:25+5:302018-09-15T00:45:30+5:30

सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. संबंधित शिक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Thought of ITI students | आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

Next

सातपूर: येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. संबंधित शिक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सातपूर येथील शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना मशीनवर काम करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी हाफबाहींचा शर्ट घालावा असा नियम असल्याने शुक्रवारी काही विद्यार्थी फूलबाहींचा शर्ट घालून आले होते. त्यामुळे पर्यवेक्षक एम. ए. बागुल यांनी या विद्यार्थ्यांना संस्थेत येण्यापासून मज्जाव केला. याचा राग आल्याने या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाºयांशी संपर्क साधला असता भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, उपमहानगरप्रमुख मंगेश पवार, आकाश मोराडे, तसेच स्वप्नील पाखले, दत्ता गरकळ, विशाल पाटील आदींनी धाव घेऊन सदर शिक्षकांच्या विरोधात प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन पुकारले. सदर शिक्षक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतात, विद्यार्थ्यांना मारहाण करतात, विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नाही, उपहारगृहाची सोय नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, डासांचा त्रास होतो अशा अनेक तक्रारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. संस्थेचे समन्वयक प्रशांत बडगुजर यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करून त्यांची बाजू ऐकून घेतली. यापुढे असा त्रास होणार नसल्याची ग्वाही देऊन दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले शिवाय मानसिक त्रास देणाºया शिक्षकांनीदेखील दिलगिरी व्यक्त केली.

Web Title: Thought of ITI students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.