सहस्त्रबुध्दे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 02:57 PM2020-02-02T14:57:39+5:302020-02-02T15:02:07+5:30
नाशिक एज्युकेशन सोसायटी द्वारा गुरु वर्य कै. ब. चिं. सहस्त्रबुद्धे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे उपस्थित होते.
नाशिक :नाशिक एज्युकेशन सोसायटी द्वारा गुरु वर्य कै. ब. चिं. सहस्त्रबुद्धे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे उपस्थित होते.
पुरस्कारामध्ये जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हा ननाशी येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुभाष बधान यांना देण्यात आला. तर आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून डॉ. प्रसाद कुलकर्णी, नंदा पेटकर, रेणू कोरडे यांना देण्यात आला. यावेळी व्यासपिठावर संस्था उपाध्यक्ष दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष दिलीप अहिरे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यकारी मंडळाचे पां.म.अकोलकर, वि.भा.देशपांडे, सरोजिनी तारापूरकर, विश्वास बोडके, भास्कर कोठावदे, स्नेहमयी भिडे, श्रीकृष्ण शिरोडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रशेखर वाड यांनी केले.अतिथींचा परिचय शैलेश पाटोळे यांनी केले. तर सुत्रसंचालन विजया दुधारे यांनी तर आभार मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी यांनी मानले.