एटीएम कार्डद्वारे ४२ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:02 PM2020-01-07T17:02:19+5:302020-01-07T17:02:37+5:30
बंँक खात्यातील रक्कम क्षणात गायब
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील युवकास एटीएम कार्ड चालू करण्यासाठी ओटीपी नंबर विचारून गुन्हेगारांनी ४२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. टाकेद बुद्रुक येथील रामनाथ जाधव यांचे एटीएम कार्ड बंद असल्याने त्यांना ६२९४८९०८१८ या क्रमांकावरून फोन आला व आपले कार्ड चालू करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वारसाचा एटीएम नंबर सांगा असे सांगितले. शेजारी त्यांचा पुतण्या रोहित सोमनाथ जाधव हा कॉलेजचा विद्यार्थी घरी असल्याने त्यास बोलाविले. तो संबंधित व्यक्तीशी फोनवर बोलू लागला. समोरच्या व्यक्तीने त्यास त्याचा एटीएम नंबर विचारून तुम्हाला एक ओटीपी नंबर येईल तो सांगण्यास सांगितले. ही प्रक्रिया होताच रोहित यांच्या बंँक खात्यातील बेचाळीस हजाराची रक्कम क्षणात गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत नाशिक पोलीस ग्रामीणला सायबर गुन्हा शाखेत तक्र ार दाखल केली असल्याचे रोहित जाधव यांनी सांगितले.