पालखेड कालवा फुटून हजारो क्यूसेस पाण्याचा अपव्यय

By Admin | Published: March 4, 2017 12:55 AM2017-03-04T00:55:12+5:302017-03-04T00:55:24+5:30

विंचूर : पालखेड डाव्या कालव्याला विंचूरपासून तीन कि.मी. अंतरावर धारणगाव व नांदगाव या गावाच्या मध्ये कालव्याला भगदाड पडून हजारो क्यूसेस पाणी नाल्याने खाली वाहुन गेले.

Thousands of cousis dissolve in Palkhed canals and wastage of water | पालखेड कालवा फुटून हजारो क्यूसेस पाण्याचा अपव्यय

पालखेड कालवा फुटून हजारो क्यूसेस पाण्याचा अपव्यय

googlenewsNext

विंचूर : पालखेड डाव्या कालव्याला विंचूरपासून तीन कि.मी. अंतरावर धारणगाव व नांदगाव या गावाच्या मध्ये कोकाटे वस्तीजवळ कालव्याला कॉँक्रीट असलेल्या भागात भगदाड पडून हजारो क्यूसेस पाणी नाल्याने खाली वाहुन गेले.
नेहमीच चर्चेत असलेला पाटबंधारे विभागाच्या विंचूर जवळ कालव्यास भगदाड पडल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. कालवा फुटला की फोडला याबाबत साशंकता आहे. घाई घाईने कालव्याचे भगदाड बुजविण्यात आले.परंतु त्यामुळे वाया गेलेल्या पाण्याला जबाबदार कोण आहे व याची भरपाई कोण करणार ? यासाठी ज्या ठिकाणी कालवा फुटला तो परीसर वरीष्ठ अधिकार्यांकडुन पाहणी करण्यात यावी.त्यामुळे कालवा फुटला की फोडला हे स्पष्ट होईल.
येवला परीसराला कालव्याचे पाणी मिळावे म्हणुन शेतकरी उपोषणाला बसले होते. त्यांच्या उन्हाळ कांद्याच्या पिकाला पाणी मिळाले नाही तर त्या परीसरातील शेतकरी उदवस्त होतील. (वार्ताहर)

Web Title: Thousands of cousis dissolve in Palkhed canals and wastage of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.