मिळकत विक्री करण्याच्या बदल्यात कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:53 AM2019-06-23T00:53:41+5:302019-06-23T00:54:13+5:30

अंबड औद्योगिक वसाहतीतील विक्रीकर आयुक्तांनी जप्त करून सील केलेला मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात १ कोटी ६० लाख रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thousands of crores in exchange for sale of property | मिळकत विक्री करण्याच्या बदल्यात कोटींचा अपहार

मिळकत विक्री करण्याच्या बदल्यात कोटींचा अपहार

Next

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील विक्रीकर आयुक्तांनी जप्त करून सील केलेला मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात १ कोटी ६० लाख रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रीकर आयुक्तांनी सील केलेली मिळकत सील काढून विक्री करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या संशयित आरोपी दिनेश सुभाष शर्मा व सुभाषचंद्र शर्मा यांनी शहरातील मेहर सिग्नल परिसरात राहणाºया एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये असणारा भूखंड विक्रीकर आयुक्तांनी सील केला होता. तो विक्री करून देण्याचे आश्वासन देत शर्मा यांनी त्याचे सील तोडून त्यावर काही बोजा नाही असे दाखविले. तसेच विक्री करण्यासाठी मुख्यत्यारपत्र राजू पवार यांस करू दिले नाही.
त्यानंतर ही मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात शर्मा यांनी डिसेंबर २०१७ ते आतापर्यंत वेळोवेळी आरटीजीएसच्या माध्यमातून १ कोटी ६० लाख रुपये घेतले. या प्रकरणात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. पवार करत आहेत.
पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी
संबंधित मिळकतीची ना हरकत पत्र न देता त्यासाठी जादा १ कोटी रुपयांची मागणी केली, तर दुसरे संशयित राज राठोड व संदीप कुटे यांनी संबंधीत भूखंड खाली करण्यासाठी पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरोधात फसवणुकीसह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thousands of crores in exchange for sale of property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.