चोकसीने नाशिकच्या कंपनीवरही काढले हजारो कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 01:13 AM2019-01-26T01:13:52+5:302019-01-26T01:14:11+5:30
पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहूल चोकसीने नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टिसर्व्हिसेस कंपनीच्या नावावरही जवळपास ३ हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी शुक्रवारी (दि.२५) त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक : पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहूल चोकसीने नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टिसर्व्हिसेस कंपनीच्या नावावरही जवळपास ३ हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी शुक्रवारी (दि.२५) त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली.
मेहूल चोकसी याने पीएनबीसोबतच देशातील अन्य बँकांनाही हजारो कोटींचा चुना लावला असल्याचा आरोप करीत संबंधित बँकांची नावे आपल्याला माहीत आहेत; परंतु ही नावे उघड केल्यास देशातील बँकिंग व्यवस्था कोलमडून सर्वसामान्यांचा पैसा अडकण्याची भीती असल्याने या बँकांची ओळख जाहीर करीत नसल्याचे देवांग जानी यांनी सांगितले. ते म्हणाले, इगतपुरी सेझ प्रकल्पात १०० हेक्टर जागेवर गीतांजली जेम्सच्या मल्टिसर्व्हिस कंपनीची नोंदणी झालेली असून, यात मेहूल चोकसीची पत्नी प्रिती चौकसी व सुधीर मेहता हे संचालक आहे. याच कंपनीच्या जागेचा तारण म्हणून वापर करीत मेहूल चोकसीने सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेकडून ५२ कोटी, तर दुसऱ्या एका बँकेकडून तब्बल ८१० कोटी ७३ लाख रुपयांचे क र्ज उचलले आहे. हा प्राथमिक स्वरूपातील माहितीवर आधारित आकडा आहे.
मेहूल चौकसी फरार झाला असला तरी अन्य सर्व संचालक मोकळे आहेत. तेही या घोटाळ्यात बरोबरीने सामील असल्याचे सांगतानाच त्यांच्यावरही कारवाई केल्यास देशातील सर्वांत
मोठा घोटाळा समोर येण्याची साशंकता देवांग जानी यांनी व्यक्त केली.
गीतांजली जेम्सच्या एकूण ४५ उपकंपन्या असून, या सर्व कंपन्या मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील लक्ष्मी टॉवरच्या आॅफिस क्रमांक ६च्या पत्त्यावर नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आलटून पालटून सर्व कंपन्यांमध्ये ठरावीक व्यक्तींनाच संचालक करण्यात आले आहेत.