गडावर हजारो भाविक नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 01:01 AM2021-10-11T01:01:40+5:302021-10-11T01:02:04+5:30
सप्तशृंगी गडावर भगवतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी उसळल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची नियोजन करताना तारांबळ उडाली. त्यात देवी भक्ताकडून शासकीय नियमांना हरताळ फासला गेला. पावसाच्या पडणाऱ्या सरीमुळे भाविकासह व्यावसायिकांचीदेखील तारांबळ उडाल्याचे चित्र गडावर दिसून आले.
कळवण: सप्तशृंगी गडावर भगवतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी उसळल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची नियोजन करताना तारांबळ उडाली. त्यात देवी भक्ताकडून शासकीय नियमांना हरताळ फासला गेला. पावसाच्या पडणाऱ्या सरीमुळे भाविकासह व्यावसायिकांचीदेखील तारांबळ उडाल्याचे चित्र गडावर दिसून आले.
पहिले दोन तीन दिवस ऑनलाईनकडे देवीभक्तांनी पाठ फिरवल्यामुळे सप्तशृंगी गडावर शुकशुकाट जाणवत होता. बहुतांशी भक्तांनी रविवारचे ऑनलाईन दर्शन पासचे बुकिंग केल्यामुळे गेल्या गुरुवार, शुक्रवार व शनिवारी तुरळक भाविक आल्याने गडावरील व्यावसायिकांना चिंता सतावत होती. तीन दिवसापासून रिमझिम पावसामुळे हार, फुले, खण, नारळ, ओटी घेण्यासाठी तुरळक येणाऱ्या भाविकांचेदेखील हाल होऊन व्यवहार ठप्प झाल्यामुळे चिंताक्रांत झालेल्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आजच्या अमाप गर्दीने हास्य फुलवले. रविवारची पर्वणी साधत सप्तशृंगी गडावर २० ते २५ हजार भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. धोंड्या-कोड्यांच्या विहिरीजवळ तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आल्याने एक ते दीड किलोमीटर भाविकांना पायी चालत दर्शनासाठी जावे लागत होते. त्या
इन्फो
२४,५०० भाविकांचे दर्शन
रविवारी (दि. १०) पाचव्या माळेची श्री भगवतीची पंचामृत महापूजा विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी सपत्नीक केली. गर्दी वाढल्यामुळे पायरीवर बाऱ्या लावून कोविड नियमांचे पालन करून टप्प्याटप्प्याने भाविकांना मंदिरात सोडण्यात येत असून प्रवेशद्वाराजवळ ट्रस्टने नारळ व तेल गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना मेटल डिटेक्टरमधून तपासणी करून प्रत्येक भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते. ललिता पंचमीच्या मुहूर्तावर तसेच रविवार सुछीचा दिवस असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऑनलाइन दर्शन पास माध्यमातून २४ हजार ५०० भाविकांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले.