२५ हजार भाविक बसने त्र्यंबककडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:30 AM2019-08-19T01:30:39+5:302019-08-19T01:31:08+5:30

तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने ईदगाह मैदान येथून रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे २५,००० भाविकांची वाहतूक केली.

Thousands of devotees leave by bus to Trimbak | २५ हजार भाविक बसने त्र्यंबककडे रवाना

२५ हजार भाविक बसने त्र्यंबककडे रवाना

Next
ठळक मुद्देउशिरापर्यंत वाहतूक : दर १० मिनिटांनी बस

नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने ईदगाह मैदान येथून रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे २५,००० भाविकांची वाहतूक केली.
श्रावण सोमवारी धार्मिक महत्त्व असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शन तसेच ब्रह्मगिरी फेरीसाठी जिल्हाभरातून भाविक त्र्यंबकेश्वरला जात असतात. त्यानिमित्ताने राज्य परिवहन महामंडळाने सुमारे अडीचशे बसेसचे नियोजन केले होते. त्यानुसार ईदगाह मैदान येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्थानकातून दीडशे, तर अन्य स्थानकातून त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी शंभर बसेसची व्यवस्था केली होती. सायंकाळी ६ नंतर भाविकांची गर्दी वाढत गेली त्यामुळे दर १० मिनिटांनी बसेस त्र्यंबककडे रवाना होत होत्या. सुमारे ३१५ फेºया रात्री ११ वाजता पूर्ण करण्यात आल्या. त्याबरोबरच नियमित १२५ फेऱ्यांमधूनदेखील प्रवासी त्र्यंबकला पोहोचले.

Web Title: Thousands of devotees leave by bus to Trimbak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.