सप्तश्रृंगीदेवीला हजारो कावडधारकांकडून जलाभिषेक, छबिन्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:43 PM2019-10-13T13:43:18+5:302019-10-13T13:43:42+5:30

कोजागरी उत्सव : वणी : कोजागरी पौर्णिमेला सप्तश्रृंगीदेवीसह जगदंबा चरणी कावडधारकानी पवित्र नद्यांमधुन आणलेले तीर्थ भक्तीभावाने अर्पण करत जलाभिषेक केला.

Thousands of Kawadas hold water consecration, photograph procession | सप्तश्रृंगीदेवीला हजारो कावडधारकांकडून जलाभिषेक, छबिन्याची मिरवणूक

सप्तश्रृंगीदेवीला हजारो कावडधारकांकडून जलाभिषेक, छबिन्याची मिरवणूक

Next

वणी : कोजागरी पौर्णिमेला सप्तश्रृंगीदेवीसह जगदंबा चरणी कावडधारकानी पवित्र नद्यांमधुन आणलेले तीर्थ भक्तीभावाने अर्पण करत जलाभिषेक केला. तृतीय पंथियांनी छबिना काढुन भगवतीला साकडे घालुन आशीर्वाद घेतले. त्यास अनुसरून सुवर्णलंकार व आकर्षक वेषभूषा परिधान केलेल्या तृतीयपंथीयांचे नृत्य उत्सवाचे आकर्षण ठरले. दरम्यान पंचक्र ोशीतील भाविकांनीही दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. पहाटे पाच वाजेपासून कावडधारकांनी आणलेल्या तिर्थाने जगदंबेला अभिषेक करण्यात आला. आठ वाजेपर्यंत पूजाविधीनंतर दिवसभरात आलेल्या कावडधारकांचे तीर्थरात्री ९ वाजेपासून घेऊन पुन्हा अभिषेक व पूजन कावडधारकांची वाढती गर्दी लक्षात घेत कावडधारकांच्या भावनांचा आदर करत कोजागरी उत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत उत्सव सोहळा सुरू होता. दरम्यान तृतीयपंथीयांच्या समुहानेही जगदंबा देवी मंदिरात वाजतगाजत प्रवेश केला. उशिरापर्यंत सुरु राहिलेल्या उत्सव सोहळ्याचा आनंद उपस्थित भाविकांनी घेतला. दरम्यान, कावडधारकांची गर्दी कमी व पदयात्रा करणाऱ्या भाविकांची गर्दी अधिक होती. त्यात युवती व महिलावर्गाचा समावेश होता. कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी सायंकाळी वणी, पिंपळगाव वणी नाशिक रस्त्यावर कावडधारक व भाविक वाद्यवृंद असा लवाजमा ठिकठिकाणी मार्गक्र मण करत होता. त्यात जगदंबा देवी मंदीराकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलुन गेले होते. जगदंबा मंदीरापासुन पिंपळगाव नाका महावीर पथ ते जगदंबा मंदीर मंदीर परिसर वणी मुळाणा रस्ता व शहरातील सर्व रस्त्यांवर भाविक व कावडधारक दिसत होते. रात्रभर या घटकांचा ओघ सुरु च होता. प्रशासनावर याचा ताण पडला होता. जिल्हाभरातुन तसेच जिल्हाबाहेरील भाविक व कावडधारक यांनी पहाटेच्या सुमारास गडावर मार्गक्र मण केले. चंडिकापुर व भातोडे हा मार्ग गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या मार्गावरु न कावडधारक व भाविकांनी जाणे पसंत केले.वणी नाशिक व वणी पिंपळगाव रस्त्यावरील वाहतुक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडल्याने या मार्गावरु न जाणारी वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती.

Web Title: Thousands of Kawadas hold water consecration, photograph procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक