सातपूर येथील जलकुंभातून हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:53 AM2019-09-01T00:53:48+5:302019-09-01T00:54:08+5:30
सातपूर कॉलनीतील जलकुंभाला तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सातपूर : सातपूर कॉलनीतील जलकुंभाला तडे गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महानगरपालिकेने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रभाग क्रमांक ११, सातपूर कॉलनी, जिजामाता शाळेजवळ असलेल्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. तसेच संरक्षक कम्पाउंडचीही दुरवस्था झालेली आहे. त्याचप्रमाणे जलकुंभाच्या पायऱ्यादेखील मोडकळीस आलेल्या आहेत. जवळच शाळेची मुले खेळत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष जीवन रायते यांच्यासह समाधान तिवडे, विकास सोनवणे, अरु ण भोसले, नीलेश भंदुरे, दत्तात्रय वामन, नवराज रामराजे, शरद सांगळे, नरेंद्र पुणतांबेकर, श्याम कुमावत, प्रदीप मुंढे, निखिल पाटील आदींनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील यांना घटनास्थळी बोलावून जलकुंभाची माहिती दिली व दुरु स्तीचे निवेदन देण्यात आले. तसेच जवळच नवीन उभारण्यात येणाºया जलकुंभाचे काम काही दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले. गेल्या काही दिवसांपासून सिडको, सातपूर, कामटवाडे, अंबड गाव या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असून, याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सातपूर कॉलनीतील जलकुंभाजवळील तुटलेले चेंबर, मोडकळीस आलेल्या पायºया यांची दुरु स्ती लवकरच करण्यात येईल. तसेच पाणीगळती थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नवीन जलकुंभाचे थांबलेले काम लवकरच सुरू व्हावे यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देण्यात येतील.
- रवींद्र पाटील, उपअभियंता, पाणीपुरवठा मनपा