सामाजिक जाणिवेतून धावले हजारो नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:36 AM2019-01-13T00:36:01+5:302019-01-13T00:37:36+5:30

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सतराव्या ‘नाशिक रन’मध्ये पंधरा हजारांहून अधिक नाशिककर गुलाबी थंडीत धावले आणि सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला. समाजातील दुर्बल आणि विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करण्याच्या धर्मादाय उद्देशाने ही रन दरवर्षी असते. विशिष्ट रंगांचा लक्षवेधी टी शर्ट हा रनचे खास वैशिष्ट. यंदाही हजारो दात्यांनी यात सहभागी होतानाच भल्या सकाळी धावण्याचा आनंद सहकुटुंब नाशिककरांनी लुटला.

Thousands of Nashik Road run by social awareness | सामाजिक जाणिवेतून धावले हजारो नाशिककर

सामाजिक जाणिवेतून नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित नाशिक रनमध्ये शनिवारी (दि.१२) हजारो नाशिककर धावले.

Next
ठळक मुद्देनाशिक रन : समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी राबविले विविध उपक्रम

सातपूर : सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सतराव्या ‘नाशिक रन’मध्ये पंधरा हजारांहून अधिक नाशिककर गुलाबी थंडीत धावले आणि सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला.
समाजातील दुर्बल आणि विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करण्याच्या धर्मादाय उद्देशाने ही रन दरवर्षी असते. विशिष्ट रंगांचा लक्षवेधी टी शर्ट हा रनचे खास वैशिष्ट. यंदाही हजारो दात्यांनी यात सहभागी होतानाच भल्या सकाळी धावण्याचा आनंद सहकुटुंब नाशिककरांनी लुटला.
महात्मानगर येथील मैदानावर आयोजित ‘नाशिक रन’च्या उद््घाटन समारंभात बॉश इंडिया उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, सहसंचालक डॉ. अंड्रेस वोल्फ, सहसंचालक जॉन ओलिव्हर व श्रीनिवासन, टीडीके इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एन. बालाकृष्णन, ए. कृष्णा, उपाध्यक्ष जेन्स कुशेल, नाशिक रनचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त प्रबळ रे, अविनाश चिंतावर, अतुल खानापूरकर, अनंथरामन, संदीप पांडे, मुकुंद भट, मोहन पाटील, एबीबीचे महाव्यवस्थापक गणेश कोठावदे, एपिरॉकचे प्लांट हेड अरविंद पाटील, पोलीस उपायुक्त आर. आर. पाटील, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक उपायुक्त अशोक नखाते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.
क़्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित स्वयंलातील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पूनम सोनूने, अभिजित हिरकुड, किसन तडवी यांनी नाशिक रनची मशाल क्र ीडांगणावर प्रदक्षिणा मारून व्यासपीठावर आगमन झाले. मयुरी नवले, श्रद्धा ठाकरे, जयश्री ठाकरे, वैष्णवी कुटे या शाळकरी गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.
रनमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांसाठी १३ लकी ड्रॉ काढण्यात आले दरम्यानच्या काळात टीडीके इंडियाकडून बॉशकडे रनचे सूत्र हस्तांतरित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. अनिल दैठणकर यांनी आभार मानले व रनची सांगता करण्यात आली. यावेळी नितीन देशमुख, मेजर रोहन तांदळे, विजय काकड, गिरीश कौशिक, स्नेहा ओक डॉ. विनिता जॉर्ज, डॉ. अर्चना सायगवकर, प्रेमकुमार शर्मा आदींसह अडीचशेहून अधिक स्वयंसेवकांनी रनमध्ये आपले विविध कामांच्या माध्यमांतून योगदान दिले.

Web Title: Thousands of Nashik Road run by social awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.