हजारोंच्या आॅर्डर देऊन नंतर करायच्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:35 AM2018-11-05T00:35:03+5:302018-11-05T00:35:27+5:30
ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे.
नाशिक : ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आॅनलाइन कंपन्या आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. आॅनलाइन कंपन्या बाजारभावापेक्षा अधिक सूट देत असल्याने स्वाभाविकपणे ग्राहकांचा ओढा त्याकडे वाढला आहे. स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम होत असून, ऐन सणासुदीत मंदीच्या सावटाखाली बाजारपेठा आहेत. इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य अनेक बाजारपेठांमधील व्यापाºयांनी संघटितपणे उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून आॅनलाइन कंपन्यांना सवलतीच्या दरात उत्पादने कशी दिली जातात, असा प्रश्न केला आहे. परंतु त्याचबरोबर या कंपन्यांच्या विरोधात यापूर्वीही बंद आंदोलन करणाºया ठिकठिकाणच्या व्यापाºयांनी वेगळाच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मित्रपरिवार, कर्मचारी आणि अन्य परिचितांच्या नावाने आॅर्डर्स दिल्या जातात. संबंधित कंपन्यांनी आॅर्डर आणल्या की, त्या विविध कारणे देऊन रद्द केल्या जातात.
गुजरातमध्ये अशाप्रकारचे आंदोलन सर्व प्रथम झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे याचप्रकारचे आंदोलन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात आॅर्डर रद्द झाल्यास त्या परत नेणे आॅनलाइन कंपन्यांच्या दृष्टीने खूप खर्चिक होते. त्यामुळे कंपन्या तो भाग हा काळ्या यादीत टाकतात आणि आॅर्डरच स्वीकारत नाही हेच लक्षात घेऊन आंदोलने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सेल लावणाºया आॅनलाइन कंपन्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.
संगमनेरमध्ये यासंदर्भात सर्वप्रथम आॅनलाइन वस्तू मागवायच्या नाहीत अशी शपथ व्यापारी संघटनेने घेतली होती. राज्यात ठिकठिकाणी आता असे व्यापारी वर्गाला आवाहन करून संघटना आंदोलन करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ७०० आॅनलाइन आॅर्डर मालाच्या डिलेव्हरीनंतर रद्द करण्यात आल्या. अनेक व्यापारी संघटनांनी तर जास्तीत जास्त आॅर्डर रद्द करणाºयांना बक्षीसही जाहीर केले आहे. - प्रफुल्ल संचेती, कार्याध्यक्ष, नाशिक व्यापारी महासंघ