सिटीलिंकमध्ये पहिल्याच दिवशी प्रवाशांचे सहस्त्रक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:11 AM2021-07-09T04:11:26+5:302021-07-09T04:11:26+5:30

नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलिंक ही सेवा सुरू करण्यात आली असून, मोबाइल ॲपसह अन्य तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा पारंपरिक बससेवेपेक्षा ...

Thousands of passengers on the first day in Citylink! | सिटीलिंकमध्ये पहिल्याच दिवशी प्रवाशांचे सहस्त्रक!

सिटीलिंकमध्ये पहिल्याच दिवशी प्रवाशांचे सहस्त्रक!

Next

नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलिंक ही सेवा सुरू करण्यात आली असून, मोबाइल ॲपसह अन्य तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा पारंपरिक बससेवेपेक्षा वेगळी आहेत. गेल्या दीड वर्षांपासून नाशिक महापालिकेची बससेवा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी या सेवेला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. त्यातच महापालिकेने निर्णय घेण्याआधी आणि नंतरदेखील राज्य परिवहन महामंडळाने शहर परिसरातील बस फेऱ्या जवळपास बंद केल्या होत्या. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हाल होत होते. तसेच अनेकांना बस उपलब्ध नसल्याने ऑटोरिक्षा आणि तत्सम साधनांचा वापर करावा लागला होता. गेल्यावर्षी कोरोनामुळे घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी राज्य परिवहन महामंडळाने बससेवेविषयी हात आखडता घेतला होता.

दरम्यान, आता महापालिकेने दीड-दोन वर्षांच्या तयारी नंतर ही सेवा पूर्ण केली आहे.

शुक्रवारी (दि.८) बससेवेचा लोकार्पण सोहळा दुपारी १२ वाजता सुरू झाल्यानंतर हा सेवा पूर्ण झाल्यानंतर बससेवा प्रत्यक्षात सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार दुपारनंतर ही सेवा सुरू झाली. एकूण २७ बस पहिल्याच दिवशी रस्त्यावर आणण्यात आल्या. त्यापैकी २० बस सीएनजी, तर ७ बस डिझेलच्या होत्या. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत नाशिक महापालिकेने जाहीर केलेल्या नऊ मार्गांवर एकूण १६४ बस फेऱ्या झाल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून एक हजार ७९ प्रवाशांची वाहतूक केली होती. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही सेवा थांबविण्यात आली. तोपर्यंत एक हजार २५४ प्रवाशांनी लाभ घेतला होता.

कोट...

महापालिकेची बससेवा चांगली आहे. मी सीबीएस ते पंचवटी कारंजा प्रवास केला. त्यासाठी पंधरा रुपये भाडे घेण्यात आले. महामंडळाचे याच मार्गासाठी दहा रुपये भाडे होते, त्यामुळे त्याबाबत विचार करावा. बससेवा चांगली असली तरी नागरिकांच्या सूचनांचा आदर करून वेळोवेळी त्यात बदल केले पाहिजेत.

विश्वनाथ सोनवणे, प्रवासी, पेठरोड (फेाटो क्रमांक १११)

....कोट..

मी इंदिरानगर ते आरके (रविवार कारंजा) प्रवास केला. बससेवा चांगली वाटली. आता काळानुरूप बदल केला पाहिजे, त्यानुसार या बसमध्ये बदल आहेत. मात्र प्रवासी भाड्याचे दर हे माफक ठेवावे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने किमान बस थांब्यावर निवारा शेड त्वरित करावेत.

- शिवाजी पाटील, प्रवासी, इंदिरानगर, (फोटो क्रमांक ११०)

...कोट..

महापालिकेच्या बससेवेचा आज पहिल्याच दिवशी लाभ घेतला. परिवहन महामंडळाच्या एसटीपेक्षा महापालिकेच्या बस स्वच्छ आणि सुंदर आहेत. बसण्याची व्यवस्थाही अत्यंत चांगली हाेती.

- फारूक शेख, प्रवासी. (फोटो ११२)

Web Title: Thousands of passengers on the first day in Citylink!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.