सोमनाथनगर येथे वादळी वाऱ्याने लाखो रु पयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:55 AM2018-06-17T00:55:35+5:302018-06-17T00:55:35+5:30
तालुक्यातील सोमनाथनगर गावासह परिसरातील अन्य वाड्या, पाड्यांना शनिवारी वादळी वाºयाचा तडाखा बसून, अनेक घरांवरील पत्रे उडाले, काहींच्या भिंती पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सोमनाथनगर गावासह परिसरातील अन्य वाड्या, पाड्यांना शनिवारी वादळी वाºयाचा तडाखा बसून, अनेक घरांवरील पत्रे उडाले, काहींच्या भिंती पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी ११ वाजता वादळी वाºयाने परिसरात आदिवासी जनतेची चांगलीच धावपळ उडाली. सोमनाथनगर येथील घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. घरावरील छपरे उडून गेल्याने लाखो रु पयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करावा लागलेले गावकरी पावसाची वाट पाहत आहेत. शनिवारी अचानक वादळी वारे वाहू लागले. लोकांना घराबाहेर पडता आले नाही. घरावरील पत्रे, कौले उडून दूरवर पडू लागले. जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ घरात बसले होते. आबालवृद्ध, लहान बालके यांची अवस्था बिकट झाली होती. वादळी वाºयाने विजेचे खांब कोसळ्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. गावकºयांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी मोहन बेंडकोळी यांनी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी तहसीलदार महेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.