नाशिकमधून ५ जूनला हजारो शिवभक्त रायगडावर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:17 PM2021-06-02T16:17:31+5:302021-06-02T16:21:53+5:30

नाशिक-  शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमधून व्यक्त केला आहे. 

Thousands of Shiva devotees will leave Nashik for Raigad on June 5 | नाशिकमधून ५ जूनला हजारो शिवभक्त रायगडावर जाणार

नाशिकमधून ५ जूनला हजारो शिवभक्त रायगडावर जाणार

Next
ठळक मुद्देतयारी सुरू ठिकठिकाणी गुप्त बैठकाआरोग्य नियमांचे करणार पालन

नाशिक-  शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमधून व्यक्त केला आहे. 

छञपती खा.संभाजी राजे भोसले यांच्या निर्देशानुसार मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर,राजू देसले ,ॲड. शिवाजी सहाणे ,तुषार जगताप,गणेश कदम,शिवा तेलंग संदीप शितोळे पूजा धुमाळ ,माधवी पाटील यांच्यासारखे आजवर पहिल्या फळीत काम करणारे समन्वयक या वेळी प्रथमच भुमीगत पध्दतीने गुप्त बैठकांना मार्गदर्शन करीत आहेत.

 मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी छञपतींचे वंशज खा. संभाजीराजे भोसले सक्रीय झाले असून राज्य सरकारकारला केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी ठरला आहे. येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भुमिका घेतली नाही तर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या समारंभानंतर छञपती खा.संभाजीराजे भोसले रायगडावरून मराठा एल्गारची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शासन प्रशासनाकडून मराठा समाजाच्या बैठकांना प्रतिबंध लावला जात आहे.नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठिकठिकाणी गुप्त बैठका घेऊन रायगड वारीचे नियोजन आखले जात आहे.

५ जूनला रायगडाकडे प्रस्थान करण्यापुर्वी शासनाची एसओपी पाळण्याची अट घालण्यात आली असून प्रत्येकाने कारोना चाचणी करून पॉझीटीव्ह नसल्याची खात्री करून घ्यावी,एका वाहनात चार व्यक्ती,सोबत मास्क ,सॅनिटायझर दोन दिवस पुरेल इतका कच्चा पक्का शिधा पिण्याचे पाणी बाळगण्याच्या सक्त सुचनाही दिल्या जात आहेत.

Web Title: Thousands of Shiva devotees will leave Nashik for Raigad on June 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.