निवडणुकीसाठी ३५ हजार कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:43 PM2019-10-20T23:43:25+5:302019-10-21T00:33:34+5:30
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १५ मतदारसंघात प्रत्येकी एक सखी मतदान केंद्र राहणार असून, त्या संबंधीचीही पूर्तता प्रशासनाने केली आहे.
नाशिक : निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १५ मतदारसंघात प्रत्येकी एक सखी मतदान केंद्र राहणार असून, त्या संबंधीचीही पूर्तता प्रशासनाने केली आहे.
प्रत्यक्ष मतदान केंद्रातील कामकाज, ईव्हीएम मशीन, मतमोजणी याबाबतची तांत्रिक माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाºया निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे ३० हजार कर्मचाºयांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती निवडणूक शाखेने केलेली आहे.