यंदा हजार शिक्षकांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:37+5:302021-04-14T04:13:37+5:30

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदाही मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली असून, ...

Thousands of teachers will be transferred this year | यंदा हजार शिक्षकांच्या होणार बदल्या

यंदा हजार शिक्षकांच्या होणार बदल्या

Next

शिक्षकांच्या दरवर्षीच बदल्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. यंदाही मे महिन्यातच या बदल्या करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आली असून, या बदल्या पारदर्शीपणे व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावरूनच ऑनलाईन या बदल्या केल्या जाणार असल्या तरी, गाव, तालुका, जिल्हा पातळीवर असलेल्या शिक्षकांची मंजूर पदे, रिक्त पदांचा मेळ घालूनच या बदल्या करण्यात येणार असून, कोणतीही शाळा शिक्षकांविना राहू नये, असे धोरण आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा कधी सुरू होतील त्याविषयी अनिश्चितता असली तरी, शाळा सुरू होण्यापर्वीच बदल्यांची कार्यवाही पूर्ण केली जावी, अशा सूचना आहेत.

------

दिव्यांग, आजारी, विधवा शिक्षकांना प्राधान्य

शासनाच्या बदल्यांच्या धोरणात दिव्यांग, गंभीर आजारी असलेले, विधवा, परित्यक्ता हृदयरोगी, कॅन्सर, किडनी आजार असलेल्या शिक्षकांना या बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी मात्र अशा शिक्षकांना आपल्या आजाराविषयीचे प्रमाणपत्रे सादर करावे लागणार आहे.

-------------

बदलीपात्र शिक्षकांचे निकष निश्चित

शिक्षकांच्या बदल्या करताना त्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असून, त्यातही त्या त्या शाळेतील शिक्षकांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाणार आहे. जेणेकरून एकाच सोयीच्या ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना अन्यत्र नेमणूक दिली जाणार आहे.

----------------

या बदल्यांमध्ये आंतरजिल्हा बदली करून येणाऱ्या शिक्षकांनाही संधी देण्यात आली आहे. आहे त्या ठिकाणाहून अन्य जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी चार जिल्ह्यांचा पर्याय सुचवावा लागणार आहे. त्यातही त्यांनी प्राधान्यक्रम देणे क्रमप्राप्त आहे. त्या त्या जिल्ह्यातील रिक्त पदे व तेथून बदलून जाण्यास इच्छूक असलेल्या शिक्षकांच्या संख्येत या बदल्या केल्या जातील.

------------

सध्याची कोरोनाची भयावह परिस्थीती पाहता, यंदा शासनाने शिक्षकांच्या बदल्या टाळणेच योग्य होते. शासनाने कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्यावर लक्ष केंद्रीत करावयास हवे. सारे स्थिरस्थावर झाल्यावर बदल्यांचा विचार करता येऊ शकतो. गेल्या वर्षीदेखील शासनाने बदल्या टाळल्या होत्या. फक्त आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ज्यांची गैरसोय होत आहे. अशा शिक्षकांच्या बदल्या करण्यास हरकत नाही. मात्र, प्रशासकीय बदल्यांना महत्व नको.

- वैभव उपासनी, सहचिटणीस राज्य प्राथमिक शिक्षक संघ

Web Title: Thousands of teachers will be transferred this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.