२७ हजार मतदारांनी ‘नोटा’ वापरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:43 AM2019-10-26T01:43:55+5:302019-10-26T01:44:10+5:30
नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले असले तरी २७ हजार मतदार असेही आहेत की त्यांनी रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे.
नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले असले तरी २७ हजार मतदार असेही आहेत की त्यांनी रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे. विशेष म्हणजे नाशिक पूर्व आणि इगतपुरी मतदारसंघातून तीन हजारांपेक्षा अधिक मतदारांनी उमेदवारांना नापसंती दर्शविली. या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांनी पक्ष बदलून निवडणूक लढविल्याने चुरस निर्माण झाली होती.
निवडणूक लढविणाऱ्यांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल किंवा मतदाराला तो मतदान करण्यायोग्य वाटत नसेल तर त्यांच्यासाठी ‘नोटा’ अर्थात ‘नन आॅफ द अबॉव्ह’चा पर्याय देण्यात आला आहे. ईव्हीएममध्ये सर्वांत शेवटी ‘नोटा’चे बटण देण्यात आले आहे.
या निवडणुकीत सर्वच मतदार-संघातून उमेदवारांना नाकारणाºया मतदारांची संख्या २६ हजार ९४५ इतकी आहे. इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सर्वाधिक तीन हजार २४ मतदारांनी नोटाचे बटण दाबले. मालेगावमध्ये मतदारसंघात सर्वांत कमी १ हजार १४३ मतदारांनी
नोटा दाबत उमेदवारांना नाकारले. यंदा जिल्ह्यात ६२ टक्के मतदान झाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा टक्का घसण्याबरोबर ‘नोटा’ दाबण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख ४४ हजार इतकी असतानाही केवळ २८ लाख १८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर २६ हजार ९४५ मतदारांनी ‘नोटा’ दाबून नापसंती दर्शविली. सर्वाधिक नोटाचा वापर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात झाला. या ठिकाणी ३ हजार ५९ मतदारांनी नोटाचा मार्ग निवडला. मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वांत कमी १ हजार १४३ मतदारांनी नोटा दाबत उमेदवारांना नाकारले. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदान केंद्रांपर्यंत मतदार आणण्यासाठीच्या सुविधादेखील दिल्या जातात. मतदानाचे राष्टÑीय कर्तव्य बजविण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जात असली तरी नोटाचा पर्यायही समोर असल्याने अनेक मतदार नोटाचाही वापर करतात. यंदा तो अधिक करण्यात आल्याचे दिसून आले.