साडेसहा हजार मतदारांची नावे वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:11 PM2020-03-06T13:11:55+5:302020-03-06T13:12:20+5:30
सिन्नर - सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाला उशीरा शहाणपन सुचले असून निवडणुकीपुर्वी तक्र ार करून देखील मतदार यादीतच असलेली दुबार, मृत, अन्यत्रवासी आणि अभिकथित संशयित अशाप्रकारची सुमारे सहा हजार ५१२ मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सिन्नर - सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाला उशीरा शहाणपन सुचले असून निवडणुकीपुर्वी तक्र ार करून देखील मतदार यादीतच असलेली दुबार, मृत, अन्यत्रवासी आणि अभिकथित संशयित अशाप्रकारची सुमारे सहा हजार ५१२ मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यावर कुणाची हरकत असल्यास ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुराव्यानिशी तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार राहुल कोताडे यांनी नोटीस च्या माध्यमातून केले आहे.
सिन्नर तालुक्यातील सुमारे १०० ग्रामपंचायतींची जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपत आहे असून या सर्व ग्रामपंचायतींसाठी जून ते आॅगस्टदरम्यान सार्वित्रक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदार यादीचे सर्वेक्षण करताना बहुतेक गावातील मतदारांची नावे ही दुबार असल्याचे तसेच काही अन्यत्र स्थलांतरित असल्याचे समोर आले आहे. काही व्यक्ती मृत असूनही त्यांची नावे मतदार यादीत कायम असल्याने निवडणूक प्रक्रि या चोख पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने सुमारे ६ हजार ५१२ मतदारांची यादी बनविली आहे. या यादीतील नावे मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम २१ अन्वये वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, अशा मतदारांची नावे वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ज्या मतदारांची नावे वगळण्याबाबत हरकत आहे, अशा मतदारांनी बुधवार दि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा सिन्नर तहसील कार्यालयात रिहवास व ओळखीच्या पुराव्यासह समक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळेत संबंधित नावाची व्यक्ती उपस्थित न राहिल्यास नावे वगळण्यासंदर्भात काही एक हरकत नाही असे गृहित धरून या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी राहुल कोताडे यांनी सांगितले.