आॅनलाइन व्यवहारातून युवकास हजारोंचा गंडा

By Admin | Published: November 15, 2016 01:56 AM2016-11-15T01:56:34+5:302016-11-15T02:07:04+5:30

आॅनलाइन व्यवहारातून युवकास हजारोंचा गंडा

Thousands of youths through online transaction | आॅनलाइन व्यवहारातून युवकास हजारोंचा गंडा

आॅनलाइन व्यवहारातून युवकास हजारोंचा गंडा

googlenewsNext

 नाशिक : बँकेच्या आॅनलाइन व्यवहारासाठी केलेल्या ओटीपीचा (वन टाईम पासवर्ड) गैरवापर करून जेलरोड येथील नीलेश विलास चौधरी (२१, रा. मंगलमूर्तीनगर) या युवकाच्या बॅँक खात्यामार्फत वेगवेगळे व्यवहार करून त्यास २९ हजार रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीलेश चौधरी याने शनिवारी (दि़१२)आपल्या अ‍ॅक्सिस बँक खात्यामार्फत आॅनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी त्याने वापरलेल्या ओटीपीचा गैरवापर करून संशयिताने दुपारी १२़३० ते १२़४० या अवघ्या दहा मिनिटांत वेगवेगळे व्यवहार करून २९ हजार रुपये खात्यातून काढून घेतले़
याप्रकरणी चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of youths through online transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.