‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:25 AM2017-08-08T00:25:44+5:302017-08-08T00:26:32+5:30
मुखेड (ता. येवला) येथील मविप्र जनता विद्यालयात रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
येवला : मुखेड (ता. येवला) येथील मविप्र जनता विद्यालयात रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्य दलातील अमोल बडवर, जम्मू-पुँछ (१५ मराठा रेजिमेंट), राजेश दराडे (नायक- कारगिल), दिगंबर शेळके (सीआरपीएफ), सहायक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर यांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव अहेर, विलास ताटीकोंडलवार, प्राचार्य राजेंद्र पाखले, रामनाथ तांदळकर, अमोल बडवर, राजेश दराडे, संजय खैरनार, नवनाथ गांगुर्डे, श्रीमती एस. बी. कोल्हे यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच सचिन अहेर, शिवसेना नेते छगन अहेर, अनंता अहेर, सूर्यकांत बडवर, विष्णू सालमुठे, गोकुळ बडवर, शेरूभाई, पर्यवेक्षक एस. आर. दाभाडे, सी. सी. खैरनार, आर. सी. महाले, एल. व्ही. लभडे उपस्थित होते. सुदर्शन बडवर या विद्यार्थ्याने देशभक्तीपर गीत गायन केले.सैनिक व पोलीस अधिकारी वर्गाचा सत्कार करून विद्यार्थीनींच्या हस्ते राखी बांधण्यात आल्या. सिमेवर तैनात सैनिकांना पाचशेहून अधिक राखी, भेटकार्ड व प्रेरणापत्र प्रदान करण्यात आले.