नाशिकच्या पूर्व भागातील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:07 AM2017-08-09T01:07:25+5:302017-08-09T01:07:42+5:30

एरव्ही जून व जुलै महिन्यात वाट पहायला लावणाºया पावसाने जिल्ह्णातील पूर्व भागात यंदा लवकर हजेरी लावल्यामुळे आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे नुकतेच उन्हं धरायला आलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

The threat of crops in the eastern parts of Nashik | नाशिकच्या पूर्व भागातील पिके धोक्यात

नाशिकच्या पूर्व भागातील पिके धोक्यात

Next

नाशिक : एरव्ही जून व जुलै महिन्यात वाट पहायला लावणाºया पावसाने जिल्ह्णातील पूर्व भागात यंदा लवकर हजेरी लावल्यामुळे आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे नुकतेच उन्हं धरायला आलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ८० टक्के पावसाची नोंद आजवर झाली असली तरी, अद्यापही मालेगाव, बागलाण, देवळा, येवला, नांदगाव या पूर्व भागातील तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी पन्नास टक्के इतकीच आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस हजेरी लावत असल्यामुळे पूर्व भागात पीक पेरणी उशिराने केली जात होती. पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात भात, नागली या पिकांसाठी उत्तम वातावरण असून नाशिक, दिंडोरी या तालुक्यात प्रामुख्याने भाजीपाला घेतला जातो. परंतु आॅगस्ट महिन्यातील गेल्या आठ दिवसांपासून या तालुक्यांकडेही पावसाने वक्रदृष्टी केली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार पश्चिम भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तेथील पिकांना जीवदान मिळू लागले आहे, परंतु भाजीपाला घेतल्या जाणाºया भागात पावसाची सातत्याने गरज आहे. पूर्व भागातील मका, सोयाबीन या पिकांची लागवड होऊन त्यांना आता खºया अर्थाने पाण्याची गरज आहे, परंतु भर पावसाळ्यात कडक उन्हाचा तडाखा पिकांना सहन करावा लागत आहे. आणखी आठ ते दहा दिवस पाऊस न झाल्यास पूर्व भागातील पिके धोक्यात येऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: The threat of crops in the eastern parts of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.