बॅँकेच्या तगाद्यामुळे आत्महत्येची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:28 AM2018-11-29T00:28:38+5:302018-11-29T00:28:57+5:30
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने कर्ज वसुली मोहिमेंतर्गत शनिवारी मातोरी येथे कर्जदार शेतकऱ्याच्या घरी वसुली पथक धडकल्याने गावात व नातेवाइकांमध्ये बदनामी झाल्याने गावातील शेतकरी साहेबराव कातड व त्यांचे कुटुंबीय व्यथित झाले असून, शासनाने दुष्काळ जाहीर करून कर्ज वसुलीला स्थगिती दिली असतानाही बॅँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
मातोरी : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने कर्ज वसुली मोहिमेंतर्गत शनिवारी मातोरी येथे कर्जदार शेतकऱ्याच्या घरी वसुली पथक धडकल्याने गावात व नातेवाइकांमध्ये बदनामी झाल्याने गावातील शेतकरी साहेबराव कातड व त्यांचे कुटुंबीय व्यथित झाले असून, शासनाने दुष्काळ जाहीर करून कर्ज वसुलीला स्थगिती दिली असतानाही बॅँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेचे कर्मचारी तालुक्यातील कर्जदार शेतकºयाच्या घरी जात असून, त्यांना कर्ज भरण्याचे आवाहन करण्याबरोबरच मालमत्ता जप्त करण्याची तसेच शेतीवर बोजा चढविण्याची धमकीही देत आहेत. बॅँकेच्या या धमकीमुळे कर्जदार शेतकरी भयभयीत झाले आहेत. शनिवारी अशाच प्रकारे जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी मातोरीत येऊन कर्जदारांच्या घरावर धडक दिली. बॅँकेच्या या कारवाईमुळे संसार उघड्यावर येईल या भीतीबरोबरच, समाजात बदनामी व नाचक्की होण्याचा धसका घेतला आहे. अशाच भीतीमुळे गावातील साहेबराव एकनाथ कातड या शेतकºयाने जिल्हाधिकारी, उपनिबंधक, विभागीयसह निबंधकांना तक्रार अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सोसायटीचे सचिव सोनावणे तसेच बँकेच्या अधिकाºयांना सततच्या नापिकीने पिकाला भाव मिळत नसल्याने कर्ज फेडता येत नसल्याने स्वत:च्या मालकीची थोडीफार जमीन विकून कर्ज फेडतो, अशी विनंती केली होती. तरीदेखील बँकेने ४० ते ५० लोक घरी पाठविले व २६ तारखेपर्यंत पैसे भर अन्यथा तुमच्या सर्व जमिनीचा लिलाव करून टाकू, असा दम भरून कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
कारवाईची मागणी
गावात व्हॉट्सअप मॅसेजद्वारे सर्व ग्रुपवर फोटो टाकून नाहक बदनामी चालविली असून, त्यामुळे व्यथित होऊन मला व माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची इच्छा होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बॅँकेच्या अधिकारी, कर्मचारी, सोसायटीचे कर्मचाºयांवर सात दिवसांत कारवाई न केल्यास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.