चोरांच्या घातप्रकाराने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:50 AM2019-07-09T00:50:13+5:302019-07-09T00:50:32+5:30

मध्यरात्री मुख्य रस्त्याच्या आसपास सहज फिरत असल्यासारखे भासवत अचानकपणे हातातील दगडाने भरलेली पिशवी दुचाकीस्वाराच्या डोक्यावर मारून त्याला खाली पाडत लुटण्याचा प्रयत्न पाथर्डी फाटा ते पाथर्डी रस्त्याच्या दरम्यान घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

 Threat of the thieves of thieves | चोरांच्या घातप्रकाराने घबराट

चोरांच्या घातप्रकाराने घबराट

Next

नाशिक : मध्यरात्री मुख्य रस्त्याच्या आसपास सहज फिरत असल्यासारखे भासवत अचानकपणे हातातील दगडाने भरलेली पिशवी दुचाकीस्वाराच्या डोक्यावर मारून त्याला खाली पाडत लुटण्याचा प्रयत्न पाथर्डी फाटा ते पाथर्डी रस्त्याच्या दरम्यान घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
शनिवारची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पाथर्डीच्या एका नागरिकाला अशाच प्रकारे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दैव बलवत्तर आणि डोक्यात हेल्मेट घातले असल्याने त्या नागरिकाच्या जिवावरचे संकट आणि आर्थिक लुबाडणूक टळली.
शनिवारी मध्यरात्रीनंतर कामकाज आटोपून पाथर्डी गावाकडे जाणारे शैलेश पाटील यांच्याबाबत घडलेला हा प्रकार खूपच गंभीर होता. या रस्त्यावरील एका प्रख्यात हॉटेलच्या पुढील भागात त्यांच्यावर तीन जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. अशा प्रकारे पिशवीतील दगडाने मारून दुचाकीस्वाराला खाली पाडत त्याला लुटण्याचा त्यांचा प्रयत्न असण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली. जीव बचावल्याने त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही.
मात्र, पाथर्डी रस्त्यावरून मध्यरात्री जाणाऱ्या नागरिकांना या प्रकारामुळे जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागण्यासारखीच ही परिस्थिती असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या परिसरात मध्यरात्रीनंतर पोलिसांनी गस्त वाढवण्याची आवश्यकता असल्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हेल्मेटमुळे बचावले
दुचाकीस्वार शैलेश पाटील येताच चोरट्यांनी शबनमसदृश पिशवी डोक्याच्या दिशेने मारली. मात्र, पाटील यांनी चपळाईने मान खाली केल्याने तो फटका डोक्यातील हेल्मेटच्या वरील भागाला लागला. त्याक्षणी या दुचाकीस्वाराने वाहनाचा वेग वाढविल्याने त्यांची सुटका झाली. मात्र, डोक्यात हेल्मेट नसते तर त्या दगडाच्या फटक्याने प्राणदेखील गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  Threat of the thieves of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.