दवाखान्यातील घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:43 AM2019-01-29T00:43:59+5:302019-01-29T00:44:25+5:30

दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 Threatened biological waste in the hospital thrown on the road | दवाखान्यातील घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला

दवाखान्यातील घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला

googlenewsNext

सातपूर : दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सातपूर परिसरातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सातपूर, त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याच्या कडेला हा जैविक कचरा फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान व शाळा आहे. जैविक कचºयामुळे कावीळ, क्षयरोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. मात्र यासंदर्भात आवश्यक त्या प्रमाणात जनजागृती केली जात नाही. सातपूर परिसरात लहान-मोठे रुग्णालये आहेत. या दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा सर्रास उघड्यावर टाकला जात आहे.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या या जैविक कचºयात सलाइन, सिरिंज, नळ्या, इंजेक्शनसह विविध औषधी गोळ्यांचा समावेश होता. या कचºयाची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा शासनाचा आदेश असताना मात्र हा कचरा उघड्यावर फेकून दिल्याने आश्चर्य व्यक्तहोत आहे. परिसरातील विद्यार्थी कुतुहलाने या कचºयातून इंजेक्शन, सलाइन नळ्या उचलतात.
४जैविक कचºयाचे व्यवस्थापन डॉक्टरांकडून केले जात नसल्याने व वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळेच सर्रास हा कचरा फेकून दिला जातो. दरम्यान, मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. कुठल्या रुग्णालयाने कचरा टाकला याचा तपास करून कारवाई करणार असल्याचे विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे यांनी सांगितले.

Web Title:  Threatened biological waste in the hospital thrown on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.