नेतृत्व करणाºयांना जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:24 AM2017-08-14T00:24:05+5:302017-08-14T00:27:54+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांच्या मागण्या या लोकशाही मार्गाने होत असताना शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांच्या मागण्या या लोकशाही मार्गाने होत असताना शेतकºयांचे प्रतिनिधित्व करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना मात्र आता धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ यांना गावातील बाधितांचे नेतृत्व करतो म्हणून इगतपुरीतील एकाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे समृद्धीचा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.
समृद्धीविरोधी शेतकरी संघर्ष समितीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ हे दि ११ आॅगस्ट रोजी आपल्या खाजगी कामात व्यस्त असताना विजय शिंदे रा इगतपुरी या व्यक्तीने गुंजाळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तू तुझ्या जमिनिपुरते बघ लोकांच्या जमिनींचा विचार करून रिकाम्या उचापती करू नको अन्यथा तुला संपवून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे या शेतकरी आंदोलनाला तालुक्यात वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. भास्कर गुंजाळ यांनी याबाबत विजय शिंदे याच्याविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला व हवालदार महीरे हे करीत आहेत. या प्रकरणावरून दलालांनी सीमा ओलांडल्याची चर्चा व्यक्त होत असून यांना नेमकं पाठबळ कोणाचं असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.