बसचालकांना धमक्या

By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:11+5:302015-08-03T22:31:18+5:30

मनमानी : खासगी प्रवासी वाहतूकचालकांकडून दादागिरी

Threats to bus operators | बसचालकांना धमक्या

बसचालकांना धमक्या

Next


वणी : सप्तशृंगगडावरील बसस्थानक परिसरातून होणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांना दमदाटी करत वाहन चालविण्यास मज्जाव केला जात असल्याने संबंधितांवर कारवाईच्या मागणीचे पत्र कळवण आगार व्यवस्थापकांनी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला दिले आहे.
ग्रामपंचायत व सप्तशृंग देवी निवासिनी ट्रस्टच्या विनंतीवरून कळवण आगार व्यवस्थापकांनी रात्री ८ वाजता नाशिकसाठी बस सुरू केली आहे. मात्र सदर बस सुरू झाल्यापासून खासगी प्रवासी वाहतूकदार सदर बसचालक
व वाहकांना धमकी देत, प्रथम खासगी प्रवासी वाहन भरल्यानंतरच बसमध्ये प्रवासी घेण्यासाठी दमदाटी करतात.
रात्री ८ नंतर बसस्थानक परिसर अवैध धंद्यांचा अड्डा बनत असून, पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच संबंधितांनी बसस्थानकाचा ताबा घेतल्याचे चित्र आहे. पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गडावर अवैध धंदे व दादागिरी वाढल्याचे बोलले जात आहे. तरी संंबंधित यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेऊन या प्रवृत्तींविरुद्ध वेळेची योग्य पावले उचण्याची मागणी सर्वसामान्य जनतेबरोबरच येणाऱ्या भाविकांनी केली आहे.

Web Title: Threats to bus operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.