गुंडांकडून खंडणी वसुलीसाठी धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:35 AM2019-07-18T00:35:58+5:302019-07-18T00:36:49+5:30
गल्लीबोळातील भाई-दादा यांची मजल आता थेट परिसरातील व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी धमकावण्यापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : गल्लीबोळातील भाई-दादा यांची मजल आता थेट परिसरातील व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी धमकावण्यापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. सातपूर, म्हसरूळ परिसरात अशा घटना घडल्याचे उघडकीस आले असून, दोघा गुंडांनी व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत सातपूर येथील पपया नर्सरीजवळ असलेल्या गुरु कृपा हॉटेल लॉजिंग व बिअर बार येथे संशयित आरोपी लंकेश याने गोंधळ घातला. प्रतीश भास्कर शेट्टी (३६, रा. उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लंकेश याने ४७५ रुपयांचे मद्यप्राशन केले. काउंटरचीही तोडफोड करून धिंगाणा घातला. त्यानंतर (एमएच १५बीटी ३१२५) क्र मांकाच्या दुचाकीवर असलेली तलवार आणून प्रतीश यांना दमदाटी करत धमकावले तसेच १५ हजार रु पये देण्याचा दम भरला. लंकेशने हॉटेलच्या गल्ल्यातील सात हजार ३०० रु पयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तसेच दुसऱ्या घटनेत हिरावाडी येथे चाकूचा धाक दाखवून एकाने व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी प्रशांत अशोक साळुंके (४३, रा. हिरावाडी) यांनी संशयित सोनू खिरकाडे विरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.