फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:07 AM2018-11-27T01:07:10+5:302018-11-27T01:07:36+5:30
वाहनास दिलेल्या मेमोचा निपटारा करण्यासाठी बनावट विमाप्रमाणपत्र देऊन प्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे़
नाशिक : वाहनास दिलेल्या मेमोचा निपटारा करण्यासाठी बनावट विमाप्रमाणपत्र देऊन प्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे़ अनू ऊर्फ सचिन बाळासाहेब साळवे (रा. मल्हार बंगला, मखमलाबाद रोड), आरटीओ एजंट शांतिलाल केरुजी निकम (५५, रा. संविधान बंगला, शिवरामनगर, टाकळीरोड) आणि राजू सगीर कादरी (३५, रा. शिवरामनगर, टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागात खटल्यांचा निपटारा करीत असताना संशयित सय्यद जाकीर हुसेन, हरिशचंद्र केशव थोरात या वाहनमालकांनी निपटाºयासाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये बनावट विमापत्र दिल्याचे समोर आले होते़ या प्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी २६ सप्टेंबर २०१८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणी पोलिसांनी तपास करून साळवे, निकम व कादरी या तिघांना अटक केली़