आजीच्या खूनप्रकरणी नातवासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:05 AM2020-03-04T00:05:11+5:302020-03-04T00:05:56+5:30

मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबाईती येथे पैशांसाठी आजीचा खून करणाऱ्या नातवासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून, तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असताना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Three arrested with granddaughter for grandfather's murder | आजीच्या खूनप्रकरणी नातवासह तिघांना अटक

आजीच्या खूनप्रकरणी नातवासह तिघांना अटक

Next
ठळक मुद्देत्यांना न्यायालयासमोर उभे केले असताना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबाईती येथे पैशांसाठी आजीचा खून करणाऱ्या नातवासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून, तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असताना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जळगाव निंबाईती येथे दि. २५ फेब्रुवारी रोजी कमलाबाई जयराम जगताप (६५) या वृद्धेचा गळा आवळून खून करण्यात आला होता. प्रथम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत नंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला हाता. तसेच मयत कमलाबाई जगताप हिच्या नातेवाइकांबाबत सविस्तर माहिती घेऊन संबंधिताना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर गुन्ह्याच्या समांतर तपासात मयत महिला ही गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाकडे सिन्नर येथे गेली होती.
मयत महिलेच्या सिन्नर येथील नातेवाइकांकडे चौकशी केली असता तिचा नातू आकाश जगताप हा घटना घडल्यापासून सिन्नर येथील घरी नसल्याबाबत माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयास्पद हालचालींवरून आकाश सुभाष जगताप (२५) रा. उद्योग भवन, ज्ञानदा पार्क, सिन्नर यास ठाणे जिल्ह्यातील कसारा येथून ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे सिन्नर येथील साथीदार आकाश बाळासाहेब शिरसाठ (२१) रा. शिवाजीनगर सिन्नर व अजय शिवाजी ताकतोंडे (१८) रा. उद्योग भवन सिन्नर याच्यासह दि. २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव निंबाईती येथे जाऊन दोरीने गळा आवळून आजीला ठार मारल्याची कबुली दिली. यातील आरोपी आकाश शिरसाठ व अजय तायकोंडे यांना सिन्नरमधून ताब्यात घेतले. आरोपींना गुन्ह्याचे समांतर तपासात विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता मयत कमलाबाई ही काही दिवसांपूर्वी तिचा मोठा मुलगा सुभाष जगताप याचे घरी सिन्नर येथे गेली होती.
त्यावेळी तिच्याजवळ तिचे जुने घर विकल्याचे दोन लाख रुपये होते. त्यानंतर ती सिन्नर येथून निंबाईती येथे गेली होती.

जळगाव निंबाईती येथे महिलेच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसमवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, संदीप दुनगहू, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, पोलीस नाईक प्रीतम लोखंडे, देवा गोविंद आदी.यातील मयत महिलेचा नातू संशयित आरोपी आकाश यास आजीजवळ पैसे असल्याचे माहीत होते. त्याप्रमाणे त्याने आकाश शिरसाठ व अजय ताकतोंडे यांना आजीकडे जाऊन पैसे आणायचे आहेत असे सांगितले. त्यानुसार दि. २५ फेब्रुवारी रोजी निंबायती येथे जाऊन त्या तिघांनी पैशांसाठी कमलाबाईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दुसºया दिवशी आकाश जगताप याने आकाश शिरसाठ यास १५ हजार तर अजय ताकतोंडे यास दहा हजार रुपये देऊन तो पुणे येथे पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झााले. जगताप व शिरसाठ हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्या दोघांवर चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Three arrested with granddaughter for grandfather's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.