अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:21 AM2018-05-09T00:21:16+5:302018-05-09T00:21:16+5:30

येवला : येवला, मालेगाव, शहरासह, नासिक-नगर जिल्ह्याच्या सीमेवर अवैधरीत्या शस्त्र बाळगणाºया सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मोहिमेत अवैधपणे हत्यारांची देवाणघेवाण करणाºया तीन जणांना नासिक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

Three arrested for illegal weapons | अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांना अटक

अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तिघांना अटक

Next
ठळक मुद्दे२ लाख २० हजार ५०० रु पयांचा मुद्देमाल हस्तगतआणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

येवला : येवला, मालेगाव, शहरासह, नासिक-नगर जिल्ह्याच्या सीमेवर अवैधरीत्या शस्त्र बाळगणाºया सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मोहिमेत अवैधपणे हत्यारांची देवाणघेवाण करणाºया तीन जणांना नासिक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. रीहान अहमद, हरीचंद्र कचरू शेवरे व दीपक उर्फ सोनू गुलाब पवार अशी या तीघांनी नावे आहेत. पथकाने केलेल्या कारवाईत ३ गावठी कट्टे , २ जिवंत काडतुसे, मोबाईल फोन व दोन दुचाकी असा एकूण २ लाख २० हजार ५०० रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयीतांची चौकशी केली असता जबरी लुटमारीचा एक गुन्हा उघडकीस आला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. नासिक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येवला शहरात शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संजय गांधी नगर परिसरातील गारु डी गल्लीत सापळा रचून हरीचंद्र कचरू शेवरे (२८) रा.वांजूळे ता.दिंडोरी हल्ली मुक्काम संजय गांधीनगर येवला यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल मिळून आले. त्याने १५ दिवसांपूर्वी त्याच्या साथीदारासह दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परीसरात रात्रीच्या सुमारास एका दुचाकीस्वारास अडवून त्याची मोटारसायकल, मोबाईल, व रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात चोरलेली ४० हजार रु पये किमतीची टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील वडगाव शिवारात सापळा रचून रीहान अहमद अशपाक अहमद (३०) रा. नयापुरा, अरब चौक, मालेगाव यास देवरे गार्डन येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता एक सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. दरम्यान ७ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना येवला ते कोपरगाव रोडवर एक इसम लाल व काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकलवर संशियतरीत्या फिरत असल्याचे समजल्याने पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी सापळा रचून दीपक उर्फ सोनू गुलाब पवार (२२ ) रा. गणेशखिर्डी पो. येसगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर यास ताब्यात घेतले. असता त्याच्या गाडीच्या पेट्रोल टाकीच्या बाजूस असलेल्या कुलंटच्या प्लास्टिक बॉक्स मध्ये एक गावठी पिस्तुल आढळून आले.
 

Web Title: Three arrested for illegal weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा