टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:05 AM2018-08-28T00:05:16+5:302018-08-28T00:23:33+5:30

टेहळणी करून महागडे मोबाइल चोरणाºया तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी बळी मंदिर परिसरातून सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़

Three arrested mobile mobile thieves caught watching | टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक

टेहळणी करून महागडे  मोबाइल चोरणाऱ्या तिघांना अटक

Next

नाशिक : टेहळणी करून महागडे मोबाइल चोरणाºया तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी बळी मंदिर परिसरातून सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ऋषिकेश सुभाष चव्हाण (२१), अजय ऊर्फ काळ्या विष्णू घोडके (१९, दोघे रा. साई महिमा सोसायटी, बळी मंदिरामागे), प्रवीण ऊर्फ गोल्या सिद्धार्थ शिरसाठ (१९, रा. अमृतधाम, साईनगर, पंचवटी) असे मोबाइल चोरट्यांची नावे आहेत.  आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांना या संशयितांची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून या तिघांना अटक केली़  या तिघांकडून सॅमसंग, मायक्रोमॅक्स, नोकिया, रेडमी, एलवायएफ, एलजी, स्पाईस, व्हिवो कंपन्यांचे महागडे मोबाइल जप्त केले आहेत़ या संशयितांकडून घरफोडीच्या आणखी काही घटनांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, हवालदार देसले, खुले, राजू गांगुर्डे, अनिल केदारे, मिथुन गायकवाड यांनी ही कामगिरी केली़

Web Title: Three arrested mobile mobile thieves caught watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.