सोनवणे यांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:18+5:302021-05-07T04:16:18+5:30

दोन दिवसांपूर्वी राजीवनगर येथील संपर्क कार्यालयावर दुपारी ू१ वाजेच्या सुमारास ८ ते १० मोटारसायकलने येत देशमुख व त्याच्या १० ...

Three arrested for vandalizing Sonawane's office | सोनवणे यांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी तिघे ताब्यात

सोनवणे यांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी तिघे ताब्यात

Next

दोन दिवसांपूर्वी राजीवनगर येथील संपर्क कार्यालयावर दुपारी ू१ वाजेच्या सुमारास ८ ते १० मोटारसायकलने येत देशमुख व त्याच्या १० ते १५ साथीदारांनी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली तसेच कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या महापालिकेच्या शासकीय वाहनांचेही नुकसान केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित देशमुखसह त्याच्या साथीदारांवर दरोडा, शासकीय वाहनांचे नुकसान, दंगल माजविणे यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके संशयित आरोपींना अटक करण्यासाठी मागावर होते. गुरुवारी (दि.६) संध्याकाळी साडेसात वाजता गुन्ह्यातील संशयित आरोपी उपेंद्र थोरात (२८, समर्थनगर), विकास कर्डिले (३३, सदिच्छानगर इंदिरानगर), मयूर आवटे (३२ पाटीलनगर सिडको), यांना पोलिसांनी सापळा रचून द्वारकामाई चौकात ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, संदीप सानप, शरद आहिरे, अमीर बागल यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित मुख्य सूत्रधार सागर देशमुख व त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे. गुरुवारी देशमुख याने फेसबुकद्वारे व्हिडीओ प्रसारित केल्याने खळबळ उडाली.

Web Title: Three arrested for vandalizing Sonawane's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.