लग्नसोहळ्यातील चोरीप्रकरणी तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 01:40 AM2021-12-23T01:40:29+5:302021-12-23T01:40:55+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील गावठा परिसरातील कॅपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्नसोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मात्र घटनेतील तीन संशयित आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले असून एकाने पळ काढला आहे. पोलिसांनी आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.
ठळक मुद्देइगतपुरी : मुद्देमालासह ४८ तासांत घेतले ताब्यात
इ तपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील गावठा परिसरातील कॅपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्नसोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मात्र घटनेतील तीन संशयित आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले असून एकाने पळ काढला आहे. पोलिसांनी आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.याबाबत ताराचंद केवलचंद बबेरवाल रा. घोटी यांनी फिर्याद दाखल केली होती. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमून महाराष्ट्र पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला. परिसरातील फोटो शूटिंगच्या आधारे तपास सुरू केला असता पोलीस ग्रुपच्या आधाराने आरोपी व त्यांचे मोबाईल नंबर मिळून आले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत असताना संबंधित आरोपी मुंबई येथील मीरा भाईंदर परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काश्मीरा पोलीस मुंबई यांना तपासकामी मदतीला घेत घटनेतील आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले. यात तीन आरोपी मिळाले असून यापैकी एकाने पळ काढल्याने तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.सुमारे ६ लाख ११ हजार रुपये किमतीच्या चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडे मिळून आला. या घटनेतील संशयित आरोपी अतिश अमर ससोदिया (वय २० वर्ष, रा. पोस्ट पिपलीया, ता. पचौर, जिल्हा राजगड, मध्यप्रदेश), निखिल रवि ससोदिया (वय, १९ वर्ष, रा. पिपलीया, मध्यप्रदेश) आणि करण महावीर सिंग (वय २३ वर्षे, रा. पडकोली, पो. पुराकनेरा, ता. बहा, जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया फरार असून पोलीस शोध घेत आहेत. इगतपुरी पोलिसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध ४८ तासांत लावल्याने तालुक्यात व जिल्ह्यात इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव, पोलीस नाईक मुकेश महिरे, पोलीस कॉ. सचिन बेंडकुळे, राजेंद्र चौधरी, बोराडे, विजय रुद्रे आदी करीत आहेत.