पक्ष्यांची शिकार करणारे तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 02:51 PM2021-01-18T14:51:47+5:302021-01-18T14:52:03+5:30

नांदगाव : तालुक्यात मागील महिन्यात हरणाची शिकार झाल्याचे प्रकरण ताजे असताना मालेगाव येथील शिकाऱ्यांनी रान पाखरांची (पक्ष्यांची) विक्रीच्या हेतूने शिकार केल्याने वन विभागाने तिघांना रंगेहात पकडले.

Three bird hunters | पक्ष्यांची शिकार करणारे तिघे गजाआड

पक्ष्यांची शिकार करणारे तिघे गजाआड

Next

नांदगाव : तालुक्यात मागील महिन्यात हरणाची शिकार झाल्याचे प्रकरण ताजे असताना मालेगाव येथील शिकाऱ्यांनी रान पाखरांची (पक्ष्यांची) विक्रीच्या हेतूने शिकार केल्याने वन विभागाने तिघांना रंगेहात पकडले. त्यांच्या जवळ रान पक्षी व्हलग २१, २ पारवे मृत अवस्थेत व एअर बंदूक, १०० छर्रे, सहा कटर, फासे आढळून आले. दुचाकीवरून जंगलात फिरून ते रान पाखरांची शिकार करीत होते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तिन्ही शिकाऱ्यांना जेरबंद केले. रुमान अहमद अशपाक अहमद, मालेगाव, शहीद अहमद मोहमद मुस्तफा, मुसाहीद अहमद मोहंमद मुस्तफा हे दोघे भाऊ रा. नयापुरा मालेगाव या तिघांवर वन्य पशु पक्षी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ३० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मळगाव, खायदे या भागातून शिकार करीत नांदगाव जामदरी जंगलात घुसून ते शिकार करीत होते. नागरिकांनी ही बाब वाळू चोरणाऱ्यांच्या मागावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवली. नागरिकांच्या मदतीने सर्व रस्ते बंद करूनही ते दुचाकीवरून पळ काढत होते. त्यांचा पाठलाग करीत त्यांना वेहळगाव येथे नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय बोरसे, वनपाल तानाजी भुजबळ, नारायण राठोड, दीपक वडगे, बाबासाहेब सुर्यवंशी, आर. के. दोंड, अजय वाघ, नाना राठोड आदींनी पाठलाग करून शिकारी जेरबंद केले.

Web Title: Three bird hunters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक