अपक्षासह भाजपचे तीन नगरसेवक सेनेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 01:45 AM2022-02-26T01:45:57+5:302022-02-26T01:47:51+5:30

महापाालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, सत्तारूढ भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, नाशिकरोड येथील डॉ. सीमा ताजणे, सातपूर येथील हेमलता कांडेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी शिवबंधन बाधले. त्याचबरोबर काँग्रेसच्या मार्गावर असलेले अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Three BJP corporators, including independents, have joined the army | अपक्षासह भाजपचे तीन नगरसेवक सेनेत दाखल

अपक्षासह भाजपचे तीन नगरसेवक सेनेत दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देदे धक्का : माजी उपमहापौर गिते, डॉ. ताजणे, हेमलता कांडेकर यांचा समावेश : अपक्ष मुशीर यांनीही बांधले शिवबंधन

नाशिक : महापाालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, सत्तारूढ भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, नाशिकरोड येथील डॉ. सीमा ताजणे, सातपूर येथील हेमलता कांडेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी शिवबंधन बाधले. त्याचबरोबर काँग्रेसच्या मार्गावर असलेले अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबईत झालेल्या सोहळ्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महापालिकेतील सत्तारूढ भाजपचे सुमारे १८ नगरसेवक सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यानच्या काळात काही दिवस गेले आणि भाजपनेदेखील शिवसेनेसह अनेक नगरसेवक आपल्या पक्षात असल्याचा दावा भाजपने केला असताना आता मात्र सेनेनेच धक्कातंत्राचा वापर केला आणि एकाच दिवसात भाजपच्या तीन नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र असून, त्यांचा प्रवेश अगोदरच अपेक्षित मानला जात होता, तर डॉ. सीमा ताजणे या मूळच्या शिवसेनेच्याच असून, गेल्या निवडणुकीत त्या भाजपत दाखल झाल्या होत्या, तर हेमलता कांडेकर यांचा तसा थेट राजकीय प्रवास नव्हता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्याशी त्यांचे खटके उडत होते. शुक्रवारी मुंबईत शिवबंधन बांधण्यापूर्वी त्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे रीतसर राजीनामा दिला आणि त्यानंतर मुंबईत जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

इन्फो...

उपमहापौर बागुल भाजपतच, नातू सेनेत

भाजपतून स्वगृही म्हणजेच सेनेत परतलेले सुनील बागुल यांच्या मातोश्री आणि विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी नकार दिला. भाजपकडून देण्यात आलेल्या व्हिडिओत भिकूबाई बागुल यांनी भाजपने मोठे पद दिल्याने आपण त्याचा अवमान करीत नसल्याचे नमूद केले. मात्र त्यांचे नातू आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष मनीष (शंभु) बागुल यांनी सेनेत प्रवेश केला आहे. या आधी ते भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत होते.

Web Title: Three BJP corporators, including independents, have joined the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.