नाशिक शहरात तीन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 09:55 PM2019-09-07T21:55:35+5:302019-09-07T21:55:47+5:30
नाशिक : इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसांत तीन घरफोड्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसांचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.
नाशिक : इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसांत तीन घरफोड्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसांचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.
पाथर्डी फाटा, आनंदनगर परिसरातील वास्तू रो-हाउसमध्ये कल्पेश अधिकराव पाटील (२९) यांच्या घरी १० आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत घरफोडी झाली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करत ३७ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, ९ हजार रुपयांची तीन ग्रॅम सोन्याची कर्णफुले, १ ग्रॅ्रम सोन्याचे मणी व दहा हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप करीत आहेत.
दुसरी घटना सातपूरमधील अमृतवाणी पाण्याच्या टाकीजवळ एमएचबी कॉलनीत बुधवारी (दि.४) रात्री साडेबारा ते सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी प्रवीण मोहन सोन्स यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १२ हजार रुपयांचे ब्रेसलेट, १० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपयांचा पिळदार वेढा, १० हजार रुपयांची कर्णफुले आदी दागिन्यांचा समावेश आहे. सोन्स यांची आई फ्रान्सला जाणार असल्याने ते कुटुंबासह आईला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. कडी-कोयंडा तोडून ऐवज लंपास
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडली. अशोका मार्ग परिसरातील वाजिद मकसूद खान यांच्यासह त्यांच्या शेजारच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात पाचशे रुपयांच्या ३० नोटा असे १५ हजार व पाचशे रुपयांच्या शंभर नोटा असे ५० हजार रुपये एकूण ६५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी वाजिद खान यांनी पोलिसांत फिर्याद दिली.